WHO continues to warn the US could become the new coronavirus epicenter kkg
CoronaVirus: कोरोनाचं नवं केंद्र निश्चित?; कोट्यवधींची धाकधूक वाढली By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 3:32 PM1 / 11चीनच्या हुवानमधून कोरोना जगभरात पसरला. सध्या कोरोनामुळे जगात खळबळ माजलीय. 2 / 11कोरोनानं सर्वात आधी चीनमधून थैमान घातलं. चीनमध्ये कोरोनानं ३ हजारहून अधिक जणांचा बळी घेतला.3 / 11चीननंतर कोरानानं युरोपात थैमान घातलं. इटली, स्पेन, फ्रान्समध्ये कोरोनानं १२ हजारपेक्षा जास्त जणांचा बळी गेला.4 / 11चीनपेक्षा इटलीला कोरोनाचा जास्त फटका बसलाय. कोरोनामुळे इटलीत साडे सात हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. 5 / 11इटलीची आरोग्य यंत्रणा जगातील सर्वात्तम पाचांमध्ये गणली जाते. मात्र कोरोना संकटापुढे तीदेखील मोडकळीस आलीय. 6 / 11चीन पाठोपाठ युरोपाला तडाखा दिल्यानंतर आता कोरोना अमेरिकेत थैमान घालतोय. अमेरिकेत कोरोनामुळे १ हजारपेक्षा जास्त जण मृत्युमुखी पडले आहेत.7 / 11युरोपनंतर आता अमेरिका कोरोनाचं पुढचं केंद्र असू शकतं, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय.8 / 11अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी दिली.9 / 11गेल्या २४ तासांमध्ये जगभरात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांपैकी ८५ टक्के रुग्ण युरोप आणि अमेरिकेतले आहेत. यातले ४० टक्के रुग्ण अमेरिकेन आहेत.10 / 11अमेरिका कोरोनाचं पुढील केंद्रस्थान ठरू शकतो. मात्र अमेरिकन आरोग्य यंत्रणा ही परिस्थिती टाळू शकतात. त्यांच्याकडून परिस्थिती कशी हाताळली जाते, यावर सर्वकाही अवलंबून असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.11 / 11अमेरिकेत कोरोनाचे ६८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. चीन आणि इटलीनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्म अमेरिकेत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications