शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WHO चा इशारा! ‘इतके’ टक्के लसीकरण आवश्यक; तरच होईल कोरोनाचे संकट दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 7:03 PM

1 / 15
जिनेव्हा: भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर किंचित कमी होताना पाहायला मिळत आहे. भारतात नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना पाहायला मिळत असली, तरी मृत्यूंचे वाढलेले प्रमाण चिंतेत भर टाकणारे ठरत आहे.
2 / 15
जागतिक स्तरावरील अनेक देशांमध्ये कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढत असून, तेथे तिसऱ्या लाटेची इशारा देण्यात आला आहे.
3 / 15
कोरोनाची महासाथ इतक्या संपुष्टात येणार नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे युरोप संचालक हान्स कुल्गे यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.
4 / 15
भारतासह संपूर्ण जगात आतापर्यंत १६ कोटींहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंत ३५ लाखांहून अधिक रुग्णांचे प्राण गेले आहेत. लोकसंख्येच्या ७० टक्के जणांचे लसीकरण होणे आवश्यक आहे.
5 / 15
त्याशिवाय महासाथीचा आजार संपुष्टात येणार नाही, असे स्पष्ट मत हान्स कुल्गे यांनी व्यक्त केले आहे. तसेच कोरोना लसीकरणाच्या संथ वेगाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
6 / 15
वेगाने संसर्ग फैलावणाऱ्या वेरिएंटमुळे चिंता वाढली असल्याचे कुल्गे यांनी सांगितले. भारतात आढळलेला B.1617 हा वेरिएंट ब्रिटनमध्ये आढळलेल्या B.117 पेक्षाही अधिक संसर्गजन्य आहे, असे ते म्हणाले.
7 / 15
महासाथीच्या आजारामध्ये वेग हाच महत्त्वाचा घटक आहे. कोरोनाच्या संसर्गाला जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्यानंतरही अनेक देशांनी आपला मौल्यवान वेळ वाया घालवला, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
8 / 15
कोरोनाच्या संसर्गाला मात देण्यासाठी वेगाने लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. लसीकरणाचा वेग कमी असून लशींची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे.
9 / 15
जगभरात दररोज आढळणाऱ्या बाधितांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली आहे. जगभरात आतापर्यंत १६ कोटीजणांना करोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधित आणि मृतांची संख्या नोंदवण्यात आली आहे.
10 / 15
दरम्यान, अत्यंत कडक लॉकडाऊन आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरण करत ब्रिटनने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवले होते. मात्र शुक्रवारी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या ४ हजार १८२ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या दोन महिन्यांमध्ये ब्रिटनमध्ये एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत.
11 / 15
वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन हटवण्याची योजना अधांतरी लटकली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४४ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, १ लाख २७ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
12 / 15
यादरम्यान, ब्रिटनने कोरोनावरील अजून एका लसीला मान्यता दिली आहे. आता ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोसच्या माध्यमातूनही लसीकरण होणार आहे.
13 / 15
देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. यावर्षी एक एप्रिलनंतर शुक्रवारी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णंची नोंद झाली आहे. तसेच गेल्या आठवड्याच्या तुलनेत ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
14 / 15
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार वाढत्या रुग्णसंख्येने संशोधकांची चिंता वाढवली आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्रिटनमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका दिसू लागला आहे.
15 / 15
डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर ब्रिटनमध्ये जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दररोज कोरोनाचे ७० हजार रुग्ण सापडत होते. मात्र रुग्णांच्या वाढत्या संख्येने सरकारची चिंता वाढवली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना