शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nancy Pelosi: कोण आहेत चीनला आव्हान देणाऱ्या नॅन्सी पेलोसी, १४ वर्षांपूर्वी त्यांच्या भारत दौऱ्यामुळे झाला होता ड्रॅगनचा तीळपापड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 5:12 PM

1 / 7
अमेरिकन सीनेटच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा सध्या जगभरात चर्चेत आहेत. तसेच पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यानच चीनने आपली २१ लढाऊ विमानं तैवानच्या एअर डिफेन्स क्षेत्रात घुसवली होती. मात्र चीनच्या धमक्यांना भीक न घालता नॅन्सी यांनी आपला तैवान दौऱा पूर्ण केला.
2 / 7
तैवानमधील लोकशाहीच्या रक्षणासाठी अमेरिका कटिबद्ध आहे. अमेरिका तैवानला दिलेल्या आश्वासनापासून मागे हटणार नाही, असे नॅन्सी पेलोसी यांनी सांगत चीनला डिवचले आहे. मात्र नॅन्सी यांनी चीनला आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी १९९१ आणि २००८ मध्येही चीनला डिवचले होते.
3 / 7
नॅन्सी पेलोसी अमेरिकेच्या सीनेटमधील स्पीकर (अध्यक्ष) आहेत. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांनंतर हे तिसरे सर्वात मोठे पद आहे. या पदावर नॅन्सी यांचा हा चौथा कार्यकाळ आहे. २०१९ पासून त्या या पदावर आहेत. त्यांचं वय ८१ वर्षे आहे, तसेच त्यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी त्यांचे वडील आणि भावाने बाल्टिमोरचे महापौरपद भूषवलेले आहेय
4 / 7
नॅन्सी पेलोसी ह्या १९८७ मध्ये पहिल्यांदा खासदार बनल्या होत्या. २००७ मध्ये त्यांची स्पीकर म्हणून निवड झाली होती. नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा हा गेल्या २५ वर्षांत अमेरिकेतील कुठल्याही लोकनियुक्त सर्वोच्च नेत्याने केलेला पहिला दौरा आहे. तत्पूर्वी १९९७ मध्ये तत्कालीन हाऊस स्पीकर न्यूट गिनरिच यांनी तैवानचा दौरा केला होता.
5 / 7
यापूर्वी नॅन्सी पेलोसी यांनी १९९१ मध्ये बीजिंग दौऱ्यावर असताना थियानमेन चौकात जात एक फलक फडकावला होता. चीनमधील लोकशाहीच्या लढ्यासाठी जे मारले गेले त्यांच्यासाठी बॅनर आहे, असे त्यांनी या बॅनरवर लिहिले होते. थियानमेन चौकामध्ये लोकशाहीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करून रणगाडे चालवले गेले होते. त्यात शेकडो विद्यार्थी मारले गेले होते.
6 / 7
दरम्यान, २००८ मध्ये भारत दौऱ्यावर आल्या असताना नॅन्सी पेलोसी यांनी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची धर्मशाला येथे जात भेट घेतली होती. त्यावेळीही चीनने नॅन्सी यांच्या भारत दौऱ्याचा विरोध केला होता.
7 / 7
त्यानंतर २०१७ मध्ये भारतात आल्या असतानाही त्यांनी दलाई लामा यांची भेट घेतली होती. तसेच अमेरिका तिबेटचे लोक, त्यांची संस्कृती आणि भाषेसाठी कटीबद्ध आहे, असे सांगितले होते.
टॅग्स :United StatesअमेरिकाchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय