शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताला अमेरिकी निर्बंधांपासून वाचविणारा 'हिट मॅन रोहित' कोण? देशासाठी थेट कायदाच बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 4:37 PM

1 / 8
भारताला आता रशियाकडून लष्करी शस्त्रास्त्रे, सामग्री बिनदिक्कत खरेदी करता येणार आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत एका महत्वाच्या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. यामागे एका अनिवासी भारतीयाचा हात आहे. त्यानेच रशियाकडून कोणतेही शस्त्रास्त्र खरेदी केले तर त्यास अमेरिकेच्या बंदीच्या बंधनातून मुक्त केले आहे.
2 / 8
भारताने रशियाकडून मिसाईल डिफेन्स् सिस्टिम S-400 घेतली होती. यावरून अमेरिका भारतावर निर्बंध लादण्याच्या तयारीत होती. परंतू, एक विधेयक मांडले गेले आणि सारे वारेच भारताच्या बाजुने फिरले. नाटोचा देश तुर्कीने ही सिस्टिम खरेदी केली तर त्या देशाला अमेरिकेच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले आहे.
3 / 8
अनिवासी भारतीय आणि अमेरिकेचे खासदार रो खन्ना यांनी CAATSA मध्ये संशोधन करत ऐतिहासिक विधेयक प्रस्ताव सादर केला होता. त्यास अमेरिकेच्या सभागृहाने मंजुरी दिली आहे. यामुळे भारत चीनला वेसण घालू शकणार आहे.
4 / 8
रो खन्ना हे कॅलिफोर्नियाच्या 17 व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून अमेरिकी काँग्रेसचे सदस्य आहेत. ते तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. भारत-अमेरिका मैत्री मजबूत करणे हा या दुरुस्तीचा सर्वात महत्वाचा भाग होता, असे रो यांचे म्हणणे आहे. अणुकरारानंतरचा हा सर्वात मोठा क्षण असल्याचे ते म्हणाले.
5 / 8
रो यांचे खरे नाव रोहित खन्ना असे आहे. त्यांचा 13 सप्टेंबर 1976 रोजी फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया येथे जन्म झाला होता. त्यांचे आई-वडील पंजाबचे होते. वडील इंजिनिअर होते, तर आई शिक्षिका. वडील आयआयटीतून शिक्षण घेऊन मिशिगन विद्यापीठात गेले, तिथेच स्थाईक झाले होते.
6 / 8
रो यांच्या आजोबांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यांनी लाला लजपत राय यांच्यासोबत काम केले होते. रो खन्ना यांनी 1998 मध्ये शिकागो विद्यापीठातून अर्थशास्त्रात बॅचलर पदवी मिळवली.
7 / 8
भारताने S-400 या डिफेन्स सिस्टिमच्या पाच युनिटची रशियासोबत डील केली होती. हा 5.4 अब्ज डॉलरचा करार होता. मात्र, याचवेळी तुर्कीवर ही डिफेन्स सिस्टिम घेतल्याने अमेरिकेने निर्बंध लादले होते. तसेच एफ-16सी फायटर जेट देण्यासही नकार दिला होता.
8 / 8
अमेरिकी सिनेटने एनडीएएवरील चर्चेत आवाजी मतदानाने भारतासाठीची विधेयक दुरुस्ती संमत करण्यात आली. यावर चर्चा होणे बाकी असले तरी आतापर्यंतच्या चर्चेत हे विधेयक रद्द होणार नाही हे निश्चित झाले आहे. चीनविरोधात अमेरिकेने भारतासोबत उभे राहिले पाहिजे, हे पटवून देण्यात रोहित खन्ना यशस्वी झाले आहेत.
टॅग्स :AmericaअमेरिकाrussiaरशियाIndiaभारतchinaचीन