who is joshua wong? 23 years old youth behind biggest hong kong protest against china hrb
बाबो! बलाढ्य चीनच्या साम्राज्याला अवघ्या २३ वर्षांच्या तरुणाने सुरुंग लावला; हॉंगकॉंग पेटले By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 8:51 PM1 / 11जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनला एका २३ वर्षांच्या तरुणाने नाकीनऊ आणले आहेत. एकीकडे चीन अमेरिका, रशियासारख्या मोठ्या शक्तींना जुमानत नसताना या पठ्ठ्याने चीनच्या साम्राज्यालाच सुरुंग लावण्याची तयारी सुरु केली आहे. 2 / 11चीनच्या ताब्यात हाँगकाँग गेले आहे. तेथे राज्य करण्याची चीनचे मनसुबे या २३ वर्षांच्या तरुणाने उधळून लावले आहेत. चीनविरोधात तेथील तरुणच ढाल बनून उभे ठाकले आहेत. 3 / 11आणि या तरुणांचा नेता आहे दुबळ्या शरीरयष्टीचा जोशुआ वॉन्ग. त्यानेच चीनविरोधी आंदोलनाची मारलेली फुंकर आता वणवा बनली आहे.4 / 11एक वर्षापूर्वी हाँगकाँग सरकारने संसदेत एक विधेयक मांडले होते. त्यामध्ये हाँगकाँगमधील आंदोलकांना चीनमध्ये नेऊन शिक्षा करण्यात यावी अशी सोय करण्यात आली होती. नेमका हाच मुद्दा तेथील तरुणांना खटकला आणि सारे रस्त्यावर उतरले. 5 / 11हाँगकाँगच्या तरुणांना वाटले की चीनची कम्युनिस्ट पार्टी या विधेयकाद्वारे आपला आवाज दाबणार आहे. खरेतर हाँगकाँगला विशेष दर्जा असल्याने तेथील कायदे वेगळे आहेत. 6 / 11या आंदोलकांना नेतृत्व नव्हते. यामुळे जोशुआने त्यांचे नेतृत्व करायला सुरुवात केली. आंदोलनाची तिव्रता पाहून सरकारने ते विधेयक मागेही घेतले. मात्र, वर्षभरानंतरही तेथील आंदोलन सुरुच राहिले. 7 / 11लाखो लोकांनी हीच ती वेळ समजून आवाज वाढवायला सुरुवात केली आणि लोकशाहीची मागणी जोर धरू लागली. जोशुआचा पक्ष डोमेसिस्टोमध्ये सर्वाधिक नेत्यांचे वय हे २०-२५ च्या आसपास आहे. 8 / 11जोशुआ हा कोणी साधासुधा तरुण नाहीय. तो त्याच्या पक्षाचा महासचिवही आहे. शिवाय त्याने राजकारणात येण्याआधी स्टुडेंट ग्रुप स्कॉलरीझमची स्थापनाही केली होती. वॉन्ग याने २०१४ मध्ये आंदोलन छेडले होते. यामुळे तो जगाच्या पटलावर आला होता. 9 / 11त्याच्या अंब्रेला मुव्हमेंटमुळे त्याचे नाव टाईम्सच्या २०१४ च्या उभरत्या युवा नेतृत्वाच्या यादीमध्ये आले होते. २०१५ मध्ये फॉर्च्युन मैगझिनने त्याला जगातील महान नेत्यांच्या यादीमध्ये सहभागी केले. तर २०१८ मध्ये वॉन्गला नोबेलसाठी नामांकित करण्यात आले होते.10 / 11वॉन्गला आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना ऑगस्ट २०१७ मध्ये तुरुंगात पाठविण्यात आले होते. त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता की, २०१४ मध्ये सिव्हिक स्क्वेअरवर कब्जा करण्यात त्यांचा हात होता. यानंतर जानेवारी २०१८ मध्येही त्याला २०१४ च्याच आंदोलनामध्ये आरोपी करत अटक करण्यात आली होती. 11 / 11त्याच्या म्हणण्यानुसार हाँगकाँग सरकारने आणलेले नवीन राष्ट्रीय सुरक्षा विधेयक हे आधीच्या विधेयकापेक्षाही खूप धोक्याचे आहे. हे विधेयक हाँगकाँगच्या सुरक्षेवर नसून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीला मान्य करण्याचे आहे. याचबरोबर हाँगकाँगच्या आर्थिक आणि लोकांच्या स्वातंत्र्यासाठीही मोठे संकट निर्माण होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications