शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pinky Peerni : कोण आहेत पिंकी पीरनी? ज्यांच्या इशाऱ्यावर प्रत्येक निर्णय घेतायेत इम्रान खान!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 3:51 PM

1 / 10
पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या राजकीय परिस्थिती चांगली दिसून येत नाही. पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या बिनबुडाच्या विधानांमुळे आणि निर्णयांमुळे विरोधक आणि सत्ताधारी पक्ष, पाकिस्तानी सेना अस्वस्थ आहे. आयएसआय प्रमुख म्हणून नदीम अंजुम यांच्या नियुक्तीवरून येथील राजकीय वातावरण बिघडले आहे.
2 / 10
इम्रान खान यांनी आयएसआय चीफच्या नियुक्तीसंदर्भात लष्करप्रमुखांशी वाद घातला, कारण पिंकी पीरनी (Pinky Peerni) यांनी त्यांना जुने प्रमुख जनरल फैज हमीद यांना या पदावर ठेवण्यास सांगितले होते. तर कोण आहेत या पिंकी पीरनी? जाणून घेऊया..
3 / 10
दरम्यान, पिंकी पीरनी म्हणजेच इम्रान खान यांच्या तिसऱ्या पत्नी बुशरा मानेका आहेत. त्यांना पाकिस्तानात पिंकी पीरनी म्हणून ओळखले जाते. इम्रान खान हे बुशरा मानेका यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत, ही पाकिस्तानच्या राजकीय कॉरिडॉरमध्ये एक सामान्य चर्चा आहे.
4 / 10
बुशरा मानेका यांना इम्रान खान यांच्या आध्यात्मिक गुरू असल्याचे म्हटले जाते. फेब्रुवारी 2018 मध्ये इम्रान खान यांनी बुशरा मेनकासोबत तिसरे लग्न केले. त्या पाकपट्टणमधील बाबा फरीद गंज शकरमधील एक सुप्रसिद्ध पीर आहेत आणि त्यांना पिंकी बीबी किंवा पिंकी जादूगारनी म्हणून ओळखले जाते.
5 / 10
बुशरा मानेका या चेटूक आणि अंधश्रद्धेवर सुद्धा विश्वास ठेवतात, असेही म्हटले जाते. इम्रान खानवर याचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. तसेच, इम्रान खान यांची पत्नी बुशरा मानेका यांची छबी आरशात दिसत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, बुशरा मानेका यांना जादूटोणा, तंत्र मंत्र खूप चांगले माहित आहे आणि त्यांच्याजवळ आध्यात्मिक आणि मोहक शक्ती आहे, असेही म्हटले जाते.
6 / 10
बुशरा मानेका यांच्याजवळ दोन जिन्न आहेत, त्याचा वापर त्या वेगवेगळ्या कामांसाठी करतात, असेही लोक म्हणतात. दरम्यान, सत्य काहीही असो, मात्र आता बुशरा मानेका यांनी इम्रान खानच्या हृदयावर आणि मनावर कब्जा केला आहे, यात शंका नाही.
7 / 10
पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान खान हे 2015 मध्ये बुशरा मानेका यांना पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी ते एका जागेवर आपल्या उमेदवाराच्या विजयाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी गेले होते, तेव्हा बुशरा मानेका यांनी सांगितले होते की, पीटीआयचा उमेदवार विजयी होईल आणि निकालही त्यांच्या अंदाजानुसार आला. तेव्हापासून इम्रान खान यांनी सतत बुशरा मेनका यांना भेटायला सुरुवात केली.
8 / 10
पाकिस्तानी मीडियानुसार, बुशरा मानेका यांनी इम्रान खान यांना सांगितले होते की, जर त्यांना पंतप्रधान व्हायचे असेल तर तिसरे लग्न करणे आवश्यक आहे. मात्र, इम्रान खान यांनी तिसऱ्यांदा बुशरा मानेका यांच्याशी लग्न करतील, हे कोणालाही माहीत नव्हते.
9 / 10
40 वर्षीय बुशरा मानेका या वट्टू कुळातून येतात. त्यांचे पहिले लग्न खबर फरीद मानेका यांच्याशी झाले होते. ते इस्लामाबादमधील वरिष्ठ कस्टम अधिकारी होते. बुशरा मानेका काही वर्षांपूर्वी पतीपासून विभक्त झाल्या आहेत. बुशरा मानेका मूळच्या दक्षिण पंजाबच्या आहेत.
10 / 10
बुशरा मानेका यांना पाच मुले आहेत. त्यामध्ये दोन मुले आणि तीन मुली आहेत. बुशरा मानेका यांची दोन मुले इब्राहिम आणि मुसा लाहोर कॉलेजमधून पदवीधर आहेत. सध्या दोघेही परदेशात पुढील शिक्षण घेत आहेत. तसेच, मोठी मुलगी मेहरु ही पंजाबचे खासदार मियां अट्टा मोहम्मद यांची सून आहे.
टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान