who revealed that 13 types of corona in wuhan and 500 percent more dangerous than expectation
धक्कादायक! वुहानमध्ये ५०० टक्क्यांहून जास्त विध्वंस, १३ प्रकारचे कोरोना: WHO By देवेश फडके | Published: February 16, 2021 12:16 PM1 / 10बीजिंग : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे अवघे जग ठप्प झाले आहे. वर्ष लोटून गेले, तरी कोरोनावर नियंत्रण मिळवणे जगातील कोणत्याही देशाला अद्यापही शक्य झालेले नाही. उलट महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या देशांमध्ये कोरोनाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. 2 / 10कोरोनाची उत्पत्ती आणि प्रसाराची कारणे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांचे एक पथक चीनमधील वुहान शहरात तपासणी करण्यासाठी गेले होते. या पथकाने आपल्या प्राथमिक अंदाजात अतिशय धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. 3 / 10कोरोना विषाणूचा प्रसार चीनमधील वुहान शहरातून प्रथम झाल्याचे समोर आल्यानंतर तब्बल एका वर्षानंतर WHO च्या तज्ज्ञांच्या पथकाला चीनने तपासणी करण्याची परवानगी दिली. वुहानमध्ये कोरोनाचे १३ प्रकार आढळून आले असून, प्राथमिक अंदाजापेक्षा ५०० टक्क्यांहून अधिक विध्वंस झाला आहे, असा दावा WHO कडून करण्यात आला आहे. 4 / 10कोरोनाचा प्रसार आणि उगम चीमधील वुहान येथून झाल्याचे सांगण्यात येत असून, रिसर्चर पिटर इमरबॅक यांनी याबाबत अभ्यास केला आहे. त्यानंतर कोरोना संसर्ग आणि प्रसाराबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. वुहान शहरात कोरोनाचा प्रसार डिसेंबरमध्ये सुरू झाला, असे सांगितले जात आहे. 5 / 10कोरोनाच्या प्रकारावरही या तज्ज्ञांच्या पथकाने अभ्यास केला. पीटर यांनी कोरोनाच्या जनेकिटक्स बद्दलही संशोधन केले आहे. वुहान येथे डिसेंबरमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसचे तब्बल १३ वेगवेगळे जनेटिक सिक्वेन्स दिसून आले, असे पीटर यांनी सांगितले.6 / 10याचाच अर्थ डिसेंबमध्येच कोरोनाचे वेगवेगळे १३ प्रकार समोर आले होते. डिसेंबर महिन्यात वुहान शहरात कोरोनाचे एक हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले होते, असेही आता सांगितले जात आहे. 7 / 10चीनच्या सरकारी कागदपत्रांनुसार चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण १७ नोव्हेंबर २०१९ रोजी आढळला होता. डिसेंबर २०१९ मध्ये चीनमध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण होते, अशी माहिती यूनिवर्सिटी ऑफ सिडनीचे व्हायरॉलॉजिस्ट एडवर्ड होम्स यांनी दिली. 8 / 10कोरोना विषाणूचा उगम चीनमधून झाल्याचे सर्व दावे चीनने फेटाळलेले आहेत. मिलान कॅन्सर इन्टिट्यूटप्रमाणे कोरोनाचा प्रसार ऑक्टोबर २०१९ मध्ये झाला. ऑक्टोबर महिन्यात इटलीमध्ये कोरोनाचे काही रुग्ण आढळून आल्याचा अंदाज या इन्स्टिट्यूटकडून व्यक्त करण्यात आला आहे. 9 / 10दरम्यान, कोरोनावर प्रभावी लस शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. भारताने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर कोरोना लसीबाबबत एक मोठी दिलासादायक माहिती आता समोर आली आहे.10 / 10सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) तयार केलेल्या ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीच्या (Corona Vaccine) आपात्कालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) परवानगी दिली आहे. जगभरात आता सीरमच्या लसीचा वापर हा केला जाणार आहे. आता ही कोरोना लस जगातील गरीब देशांमध्ये कोरोनाविरूद्ध लढ्यासाठी वापरली जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications