शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोनावर लस म्हणजे जादूची गोळी नाही; WHO ने दिला मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 8:50 AM

1 / 15
कोरोनाचा कहर जगभरात पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने सहा कोटींचा टप्पा पार केला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.
2 / 15
कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
3 / 15
कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश येत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे.
4 / 15
संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. कोरोनावरील लस ही जादूची गोळी नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
5 / 15
कोरोनावर लस आली म्हणजे कोरोनाचा संसर्ग हा पूर्णपणे संपणार नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. WHO च्या मायकल रेयान यांनी याबाबत माहिती दिली आहे.
6 / 15
कोरोना लस विकसित झाली म्हणजे आता कोरोना पूर्णपणे नष्ट होईल असं नाही. कोरोनाची लस पुढील वर्षाच्या सुरुवातीला सर्वांनाच उपलब्ध होणार नसल्याचं देखील रेयान यांनी सांगितलं आहे.
7 / 15
कोरोना लस विकसित झाल्यानंतर ती आपल्या मेडिकल किटमधील एक प्रमुख शक्तिशाली उपकरण असणार आहे. मात्र, लस संपूर्णपणे कोरोना नष्ट करेल असं होणार नसल्याचं देखील रेयान म्हणाले.
8 / 15
कोरोना व्हायरसवर जगभरात संशोधन सुरू असून लसीच्या चाचणीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान WHO प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी कोरोनासंदर्भात मोठं विधान केलं आहे.
9 / 15
कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही असं विधान जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी केलं आहे. यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.
10 / 15
अनेक देशांमध्ये लसींवर काम सुरू आहे. काही ठिकाणी कोरोना लस ही तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यांचे परिणाम पाहिले तर आता आपण कोरोना महामारी संपेल असं स्वप्न पाहण्यास हरकत नाही असं मत टेड्रोस यांनी म्हटलं आहे.
11 / 15
प्रगत आणि श्रीमंत देशांनी लसीच्या आशेवर गरीब आणि मागास देशांना ठेवू नये असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे.
12 / 15
'कोरोना काळात जगाने माणसाची चांगली रुपं पाहिली आहेत तशीच वाईटही रुपं पाहिली आहेत. मात्र ही महामारी संपली तरीही गरीबी, भूक आणि असमानता असं मुद्दे असणार आहेत.'
13 / 15
कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक लोकांचे मृत्यू झाले आहेत. तसेच संक्रमणही पूर्णपणे संपलेलं नाही त्यामुळे काळजी घ्यावी लागणार असल्याचं देखील टेड्रोस यांनी म्हटलं आहे.
14 / 15
कोरोनावरील लस आल्यानंतर सावध राहणं गरजेचं असल्याचं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. कोरोनाची चाचणी करणं, लक्षणं आढळल्यास स्वत: ला आयसोलेट करणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
15 / 15
सध्या 51 लशीची मानवी चाचणी सुरू आहे. यातील 13 लस अंतिम टप्प्यात दाखल झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. ब्रिटनने फायजरने विकसित केलेल्या लसीला मंजुरी दिली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना