1 / 12उत्तर कोरियामध्ये सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आठवडाभरापूर्वी तेथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. 2 / 12कोरियातील कोरोना हे केवळ त्याच्यासाठी चिंतेचे कारण नाही तर संपूर्ण जगाला संकटात टाकू शकते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने धोक्याचा इशारा दिला आहे की उत्तर कोरियासारख्या ठिकाणाहून कोरोनाचे नवीन व्हेरिएंट उद्भवू शकतात. 3 / 12कोरियामध्ये लसीकरण न केलेल्या लोकांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची उच्च पातळी गाठण्याचा धोका आहे. उत्तर कोरिया हा जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य असला तरी तो एक वेगळा देश आहे. 4 / 12पहिल्या कोविड-19 उद्रेकापासून हा देश मुक्त होऊ शकला नाही. कोरोना लसींचा अभाव आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांचा देखील मोठा अभाव यामुळे तेथे कोरोना पसरण्याचा धोका वाढत आहे. 5 / 12उत्तर कोरियामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक माईक रायन म्हणाले की, जर एखादा देश उपलब्ध पद्धतींचा वापर करत नसेल, तर ती नक्कीच चिंतेची बाब ठरू शकते.6 / 12ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार इशारा दिला आहे की जिथे संसर्ग ओळखला जात नाही किंवा चाचणी केली जात नाही, तेथे नवीन व्हेरिएंटचा उदय होण्याचा सर्वाधिक धोका आहे. 7 / 12जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एधानोम गेब्रेयसस यांनीही सांगितले की, लसीकरण न केलेल्या लोकांमध्ये व्हायरसचा प्रसार ही मोठी चिंतेची बाब आहे. कोरोनाने टेन्शन वाढवलं आहे.8 / 12यूएन हेल्थ एजन्सीने यापूर्वी सांगितले होते की प्योंगयांगने अद्याप अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार उद्रेक सूचित केले नाही. हे एक प्रकारे कायदेशीर बंधनांचे स्पष्ट उल्लंघन आहे. 9 / 12जागतिक आरोग्य संघटनेची प्रतिक्रिया काय आहे असे विचारले असता, रायन म्हणाले की संस्था पूर्णपणे तयार आहे, परंतु सार्वभौम राष्ट्रामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 10 / 12गेल्या दोन वर्षांपासून जेव्हा संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला होता, तेव्हाही उत्तर कोरिया कठोर निर्बंधांमुळे त्याच्या विळख्यापासून सुरक्षित राहिला. तेथे 8 मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण नोंदवण्यात आला आहे. 11 / 12आठवडाभरात तेथील 168 जणांमध्ये कोरोना व्हायरसची पुष्टी झाली आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दीड लाखांहून अधिक लोक तापाने त्रस्त असल्याचे सांगितले जात असले तरी या तापाने 56 जणांचा बळीही घेतला आहे. 12 / 12आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत उत्तर कोरियाची स्थिती जगातील सर्वात वाईट देशांपैकी एक असल्याचे मीडिया रिपोर्ट्स सूचित करतात. कोरोनामुळे तेथील परिस्थिती गंभीर बनली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.