शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अ‍ॅडल्ट सिनेमांना ब्ल्यू फिल्म का म्हणतात? जाणून घ्या या फिल्म इंडस्ट्रीबाबतच्या धक्कादायक गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 5:09 PM

1 / 7
अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्री आजच्या काळातील असं सत्य आहे जे कुणी नाकारू शकत नाही. या इंडस्ट्रीबाबत नकारात्मक भावना असली तरी लाखो लोक या व्यवसायाशी जोडले केलेले आहे. या इंडस्ट्रीत बनणाऱ्या सिनेमांना ब्ल्यू फिल्म का म्हणतात. या उद्योगात कसं काम चालतं, याबाबतची धक्कादायक माहिती पुढीलप्रमाणे आहे.
2 / 7
अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीबाबतच्या या गोष्टी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. जगभरात अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीमधील उलाढाल ही ८ लाख कोटी रुपये एवढी आहे. तर अमेरिकेतील इंडस्ट्रीची कमाई ही १ लाख कोटी रुपयांपर्यंत आहे.
3 / 7
जगातील पहिला अ‍ॅडल्ट चित्रपट हा Le Coucher de la Mariée हा होता. तो १८९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. तो सुमारे ७ मिनिटांचा होता.
4 / 7
अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहर हे जगातील या चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी प्रसिद्ध आहे. येथील सॅन फर्नांडो परिसरात अशा चित्रपटांचं बहुतांश चित्रिकरण होते. दरम्याना, आता बहुतांश कंपन्या ह्या कॅलिफोर्निया किंवा नेवाडामध्ये शिफ्ट झाल्या आहेत.
5 / 7
अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमधील वेतनामध्ये अंतर अधिक असते. या इंडस्ट्रीमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना अधिक पैसे मिळतात.
6 / 7
अ‍ॅडल्ट चित्रपटांना ब्ल्यू फिल्म का म्हणतात, असा प्रश्न अनेकांना नेहमी पडतो. त्यामागे अनेक कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे जुन्या काळात अॅडल्ट चित्रपटांच्या कॅसेट ह्या निळ्या रंगाच्या बॅगेमधून दिल्या जात असत. दुसरं कारण म्हणजे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी या चित्रपटांचे पोस्टर्स हे निळ्या रंगाचे असत. तेव्हापासून या चित्रपटांना ब्ल्यू फिल्म म्हटलं जाऊ लागलं.
7 / 7
त्याशिवाय आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आधीच्या काळात छोटे निर्माते कमी बजेटमध्ये अॅडल्ट चित्रपट बनवायचे. त्यामुळे ते ब्लॅक अँड व्हाईट रिळाला कलरमध्ये बदलून चित्रिकरण करायचे. त्यामुळे चित्रपटांमध्ये निळ्या रंगाची छाप दिसायची, त्यामुळे या चित्रपटांना ब्ल्यू फिल्म असा केला जाऊ लागला.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयcinemaसिनेमा