शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्नाच्या २७ वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी का घेतला घटस्फोट? समोर आलं मोठं कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 11:11 AM

1 / 12
अब्जाधीश कप बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोटाची घोषणा केल्याने जगभरातील लोक हैराण झाले आहेत. लोकांना या घटस्फोटामागचं खरं कारण जाणून घेण्याची उत्सुकता आहे. यादरम्यान या घटस्फोटाच्या वेगवेगळ्या कारणांचा खुलासा होत आहे. अशात एक नवं कारण समोर आलं आहे.
2 / 12
बि़ल गेट्स यांनी त्यांच्यासोबत गोल्फ खेळत असलेल्या साथीदारांना सांगितलं की, त्यांचा आणि मेलिंडाचा संसार 'प्रेमहिन' झाला होता. दोघांनाही एकमेकांप्रति काहीच आकर्षण राहिलं नव्हतं. याच कारणाने दोघेही काही महिन्यांपासून वेगवेगळे राहत होते.
3 / 12
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ६५ वर्षीय बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्सचं लग्न २७ वर्षे चांगलं चाललं. यादरम्यान अलिकडे त्यांच्यात नात्यात दरी निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून दोघेही वेगवेगळे राहत होते.
4 / 12
बिल गेट्स यांनी वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या तणावाबाबत आधीही संकेत दिले होते. पण ही बाब घटस्फोटापर्यंत येईल याचा कुणीही विचार केला नव्हता.
5 / 12
रिपोर्टनुसार, घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर बिल गेट्स कॅलिफोर्नियाच्या गोल्फ क्लबमध्ये राहत आहेत. या गोल्फ क्लबमध्ये त्यांचा एक बंगला आहे. बिल गेट्स यांना गोल्फची फार आवड आहे.
6 / 12
मीडिया रिपोर्टनुसार, बिल गेट्स यांनी त्यांच्यासोबत गोल्फ खेळणाऱ्या काही जवळच्या लोकांना घटस्फोटाचं कारण सांगितलं आहे.
7 / 12
तेच काही रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, बिल गेट्स यांनी कथितपणे एक अब्जाधीश जेफरी एपस्टीन या व्यक्तीसोबत मैत्री केली होती. हा अब्जाधीश कथितपणे लहान मुलांकडे आकर्षित होणार एक व्यक्ती आहे.
8 / 12
या व्यक्तीसोबत मैत्री झाल्याच्या बातम्या वाचून मेलिंडा हैराण झाल्या होत्या. ऑक्टोबर २०१९ पासूनच त्यांनी वकिलांसोबत घटस्फोटासंबंधी चर्चा करणं सुरू केलं होतं.
9 / 12
एका सूत्रांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितलं की, मेलिंडा यांचा नेहमीच एपस्टीन आणि बिल यांच्या मैत्रिला विरोध होता. तेच बिल यांना ही मैत्री तोडायची नव्हती. त्यामुळे हा घटस्फोट होणार होताच.
10 / 12
सूत्रांनी सांगितलं की, बिल गेट्स यांनी एपस्टीनच्या घरी जाणं, त्याच्यासोबत वेळ घालवणं मेलिंडा यांना अजिबात आवडत नव्हतं. हाच मुद्दा दोघांमध्ये वादाचं कारण ठरल्याचा दावा केला जात आहे.
11 / 12
बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी ४ मे रोजी घटस्फोट घेण्याची घोषणा केली. दोघांनी याची घोषणा केली. पण या घटस्फोटाचं कारण त्यांनी सांगितलं नाही.
12 / 12
त्यानंतरया घटस्फोटाच्या वेगवेगळ्या कारणांचा अंदाज लावला जात आहे. दोघांच्याही या निर्णयाने अर्थात त्यांचे मुले दु:खी आहेत. तर या कपलने सांगितलं की, घटस्फोटाशिवाय आता दुसरा पर्याय शिल्लक राहिला नव्हता.
टॅग्स :Bill Gatesबिल गेटसInternationalआंतरराष्ट्रीयDivorceघटस्फोट