शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच...लिझ ट्रस यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा का दिला?, पाहा ५ मोठी कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:57 PM

1 / 8
ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी गुरुवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षातील नेतृत्वाविरोधात उघडपणे बंड केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘मी जनतेने दिलेली जबाबदारी सांभाळू शकले नाही. आपण कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा देत असल्याचे किंग चार्ल्स यांना सांगितले आहे,' असे ट्रस यांनी म्हटले आहे. त्या केवळ 45 दिवसांसाठीच पंतप्रधान होत्या. कुठल्याही ब्रिटिश पंतप्रधानाचा हा सर्वात कमी कार्यकाळ आहे.
2 / 8
महत्वाचे म्हणजे पंतप्रधान पदाच्या निवडणूक प्रचारात लिझ ट्रस यांनी ब्रिटनची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जी काही आश्वासने दिली होती, तीच त्यांच्या पदासाठी त्रासदायक ठरली. त्या पंतप्रधान झाल्यापासून इंग्लंडमधील महागाई आकाशाला भीडली आहे. यामुळे ट्रस सरकारला जनतेच्या विरोधाचा मोठा सामना करावा लागला.
3 / 8
लोकांचा विरोध आणि राकीय दबाव अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर जेरमी हंट यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, याचादेखील काहीही फायदा झाला नाही आणि हळू-हळू ट्रस यांच्या पक्षातील खासदारच त्यांचा विरोध करू लागले. लिझ ट्रस यांच्या राजीनामा देण्यामागची ५ महत्वाची कारणे समोर आली आहे.
4 / 8
भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन यांनी ब्रिटनच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
5 / 8
डझनहून अधिक खासदारांनी सार्वजनिकपणे ट्रस यांनी राजीनामा देण्यास भाग पाडले. कारण, त्यांच्या कर कपातीच्या योजनांमुळे अगोदरच संकटात असलेल्या बाजारपेठेत घसरण झाली होती.
6 / 8
ट्रस यांना कर कपातीची सर्व धोरणे मागे घ्यावी लागली. वाढीव वीजबिलावरील बंदीही हटवण्यात आली.
7 / 8
ट्रस यांनी निर्णय मागे घेतल्याने त्यांच्यावर टीका होत होती. त्यांनाअर्थमंत्र्यांना पदावरून हटवावे लागले होते.
8 / 8
कामगार नेते किर स्टारर यांनी आता सार्वत्रिक निवडणुकीची मागणी केली आहे. त्यांच्या विरोधी पक्षाने लोकांचा पाठिंबा मिळवला आहे.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय