शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राजेशाही आणि हिंदूराष्ट्रासाठी नेपाळमध्ये हिंसेंचा भडका का उडालाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 22:18 IST

1 / 7
Protests in Nepal: 2008 मध्ये नेपाळमध्ये सत्ताधारी पक्षाने संसदेतून घोषणा केली २४० वर्ष जुनी राजेशाही संपुष्टात आणली जात आहे. हिंदू राष्ट्राला एका धर्मनिरपेक्ष, संघराज्य आणि लोकशाही गणराज्यात बदलण्यात आले आहे. त्यानंतर शांतता मार्गाने नेपाळमध्ये सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण, अचानक आता १७ वर्षांनी नेपाळमध्ये हिसेंचा भडका उडाला आहे.
2 / 7
राजेशाही आणि हिंदू राष्ट्र पुन्हा प्रस्थापित करण्यात यावी म्हणून रस्त्यांवर आंदोलनं सुरू झाली आहेत. राजधानी काठमांडूतील काही भागात आंदोलक इतके हिंसक झाले की, जाळपोळ सुरू झाली. नेपाळमध्ये आंदोलक आणि पोलीस, जवान यांच्या झालेल्या झडपींमध्ये असंख्य लोक जखमी झाले आहेत.
3 / 7
नेपाळच्या सत्तेचं केंद्र असलेल्या काठमांडूमध्ये राजेशाही समर्थक आंदोलक आणि सुरक्षा जवानांमध्ये झालेल्या झटापटीमुळे राजेशाही केंद्र स्थानी आली आहे. मुख्य राजकीय पक्षाच्या रेट्यामुळे नेपाळमधून राजेशाही संपुष्टात आली, पण लोकांमधील राजेशाही प्रति असलेले आकर्षण कमी झाले नाही.
4 / 7
राजेशाही संपुष्टात आल्यानंतर पहिल्या संविधान सभेला घटना तयार करण्यात यश आले नाही. त्यानंतर २०१३ मध्ये दुसरी संविधान सभा तयार करण्यात आली. त्यावेळी नेपाळची काँग्रेस, एमाले आणि माओवादी विचाराचे पक्ष एका विचाराने पुढे जात होते. पण, राजा समर्थक राष्ट्रीय प्रजातांत्रिक पार्टीचा निवडणूक अजेंडा वेगळा होता.
5 / 7
राजेशाही हटल्यानंतर झालेल्या निवडणुकीत प्रजातांत्रिक पक्षाला यश मिळाले नाही. पुढे २०१७ मध्ये संविधान लागू करण्यात आले आणि प्रजातांत्रिक पक्षाची अवस्था आणखी बिकट झाली. त्यांना केवळ २ टक्केच मते मिळाली. २०२२ मध्ये ती ६ टक्क्यांवर पोहोचली.
6 / 7
राजेशाही असाही ही भावना तीव्र होण्याचं प्रमुख कारण म्हणजे मुख्य राजकीय पक्षांची सत्तेची हाव आणि स्पर्धा. २००८ ते २०२५ या काळात नेपाळमध्ये ११ सरकारे बनली आहेत. म्हणजेच काय तर कोणतेही सरकार दीर्घ काळ चालले नाही.
7 / 7
केंद्रातील सरकारच स्थिर नसल्याने त्याचा परिणाम राज्यातील सरकारांवरही होत आहे. त्यामुळे नेपाळमधील मध्यम वर्गीयांचा या नव्या पद्धतीने अपेक्षाभंग झाला. कारण प्रमुख राजकीय पक्ष असलेले काँग्रेस, माओवादी आणि एमाले हे सत्तेची खुर्ची कशी मिळेल, यातच व्यस्त असल्याचे चित्र असून त्यामुळे जनतेचे प्रश्न दुय्यम स्थानावर गेले आहेत.
टॅग्स :NepalनेपाळPoliticsराजकारणagitationआंदोलनWorld Trendingजगातील घडामोडी