why us experts recommend double masking amid vaccination corona variant
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून आता डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 2:41 PM1 / 14कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जाते. 2 / 14कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचण्यासाठी डबल मास्किंग म्हणजेच दोन मास्क लावा असा सल्ला आरोग्यविषयक तज्ज्ञांनी दिला आहे. 3 / 14कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान डबल मास्क लावण्याचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला जात आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा शपथविधी नुकताच झाला. यावेळी अनेक सेलिब्रिटी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या चेहऱ्यावर दोन मास्क लावले होते. 4 / 14दोन मास्क वापरण्याबाबतते व्हापासून चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेतील लोकप्रिय संसर्गजन्य विकार तज्ज्ञ अँथोनी फॉकी यांनी दोन मास्कचा वापर हा कॉमन सेन्सचा भाग असल्याचं म्हटलं आहे. 5 / 14सेलिब्रिटींनी केलेला दोन मास्कचा वापर आणि तज्ज्ञांचा सल्ला बघता वैज्ञानिक दृष्टीकोनातून दोन मास्कचा वापर खरोखर योग्य आहे का हे जाणून घेणे महत्वाचं आहे.तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्यावर दोन मास्क लावल्याने आपले व्हायरसपासून संरक्षण होऊ शकतं. 6 / 14अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्राने (सीडीसी) हा सल्ला औपचारिकपणे लागू केलेला नाही. आरोग्यसंबंधी एका रिसर्च पेपरमध्ये तज्ज्ञ मोनिका गांधी आणि लिनसे मारने यांनी नागरिकांनी किमान उच्च दर्जाचा सर्जिकल मास्क किंवा दाट कधाग्यांपासून बनवलेला मास्क वापरणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. 7 / 14दोन मास्क वापरण्याचा सल्ला देण्यामागे या मास्कमुळे फिल्ट्रेशन आधिक चांगलं होतं. विमान, रेल्वे अथवा सार्वजनिक जागी म्हणजेच ज्या ठिकाणी गर्दी असेल अशा ठिकाणी दोन मास्कचा वापर करता येऊ शकतो. 8 / 14दोन मास्कचा वापर केल्यामुळे व्हायरसपासून 50 ते 75 टक्के अधिक बचाव होऊ शकतो असं एका रिसर्चमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या संशोधनात सर्जिकल प्रकारच्या मास्कच्या पार्टीकल्स हटवण्याच्या क्षमतेवर अभ्यास करण्यात आला होता. 9 / 14सुरुवातीच्या काळात एन95 मास्कची उपलब्धता कमी असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कापडापासून तयार केलेला मास्क वापरावा, असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे नागरिक कापडाच्या मास्कचा वापर करण्याऐवजी एन95 मास्क वापरण्यावर अधिक भर देताना दिसत आहेत. 10 / 14जर्मनी आणि फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना एन 95 मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. जर्मनीमध्ये मास्कसंबंधी नवे नियम लागू करण्यात आले असून, कापडापासून बनवलेला मास्क वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. 11 / 14फ्रान्समध्ये (France) कापडापासून बनवलेला मास्क कमी प्रमाणात वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीडीसीच्या वेबसाईटनुसार, जास्त लेअर्स असलेला कापडी मास्क हा देखील सर्जिकल मास्कप्रमाणेच सुरक्षित ठरू शकतो. दोन मास्क चेहऱ्यावर लावणे अधिक सुरक्षित ठरू शकते असं संशोधक म्हणतात.12 / 14आरोग्यविषयक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सर्वप्रथम कापडी मास्क लावावा आणि त्यावर बाहेरुन सर्जिकल किंवा एन 95 मास्क लावावा. मात्र असं करताना दोनपेक्षा अधिक मास्कचा वापर अजिबात करू नये, असे केल्यास श्वसनला त्रास होऊ शकतो, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 13 / 14जर तुम्ही चेहऱ्यावरील दोन्ही मास्कमध्ये अंतर ठेवल्यास मास्क लावण्याचा मूळ उद्देशच संपुष्टात येऊ शकतो असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 कोटींवर पोहोचली आहे. 14 / 14वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications