ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 6:14 PM
1 / 10 डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनत आहेत. अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालाचे कल समोर आल्याने हे चित्र स्पष्ट झालं आहे. जगातील अनेक नेते डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन करत आहेत परंतु त्यात रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांचं आश्चर्यकारक विधान समोर आलं आहे. 2 / 10 पुतिन यांनी म्हटलंय की, मी आतापर्यंत ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. ट्रम्प यांच्या धोरणं पाहिल्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्याबाबत विचार करू. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या धोरणांवर त्यांचे मूल्यांकन केले जाईल असं स्पष्ट त्यांनी सांगितले. 3 / 10 आम्ही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजयाचा दावा करणारे डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या धोरणात्मक कार्यावर पाहू, मॉस्कोचे प्रवक्ते दिमित्री पेंसकोव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही ट्रम्प यांच्या धोरणांच्या आधारे निर्णय घेऊ. ट्रम्प यांचे अभिनंदन करण्याच्या राष्ट्रपतींच्या विचाराबाबत कोणतीही माहिती नाही कारण अमेरिका 'मित्र नसलेला देश' आहे असं रशियाने सांगितले. 4 / 10 दरम्यान यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेंस्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं केवळ अभिनंदनच केले नाही तर पुढील काळात युक्रेनला सहकार्य करण्याचं आवाहनही केले आहे. ताकदीच्या बळावर शांती आणण्याचं ट्रम्प यांचं विधानाचं झेलेंस्की यांनी समर्थन केले. 5 / 10 मला सप्टेंबर महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेली बैठक आठवते. जेव्हा आम्ही युक्रेन आणि अमेरिकेच्या रणनीती योजनेवर, विजयाच्या चर्चेवर आणि युक्रेनविरोधात रशियाचा आक्रमक पवित्रा संपवण्याबाबत विस्ताराने चर्चा केली होती अशी आठवणही झेलेंस्की यांनी करून दिली 6 / 10 दरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांना पाठिंबा देण्याचा आरोपही रशियावर आहे. रशियाने २०१६ आणि २०२० च्या निवडणुकीत ट्रम्प यांना मदत केल्याचं बोलले जाते. तसेच रशियासाठी ट्रम्प यांचे राष्ट्रपतीपदावर राहणे सर्वाधिक फायदेशीर असल्याचं सांगितले जाते. 7 / 10 ज्यो बायडन सरकार रशियाच्या कठोर विरोधात होते. युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेतील बायडन सरकारने युक्रेनला केवळ आर्थिक मदत केली नाही सैन्यही पाठवले होते. त्यामुळे रशिया आणि अमेरिकेतील संबंध आणखी ताणले गेले होते. 8 / 10 अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या विरोधात मोठी आघाडी घेतली. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सातत्याने आघाडीवर होते. 9 / 10 आश्चर्याची बाब म्हणजे ट्रम्प यांच्या आघाडीत ग्रामीण अमेरिकन विभागांचा मोठा वाटा असल्याचे दिसून आले आहे. जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिना या राज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प जिंकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. 10 / 10 २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं.आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला असून आता ते अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. आणखी वाचा