लॉस एंजल्समध्ये वेगाने पसरतोय वणवा By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 3:58 PM
1 / 5 अमेरिकेच्या पश्चिमेस असणाऱ्या लॉस एंजल्सच्या उत्तरेस लागलेला वणवा वेगाने पसरत चालला आहे. सॅंटा अॅना या वेगवान वाऱ्यांमुळे ही आगही ताशी पन्नास मीटर वेगाने पुढे सरकत आहे. 2 / 5 या आगीमुळे 2 लाख 45 हजार एकर इतक्या क्षेत्रावरचे जंगल नष्ट झाले असून 8900 कुटुंबांना आपली घरे मोकळी करुन बाहेर पडावे लागले आहे. 3 / 5 लॉस एंजल्सच्या वायव्येस असणाऱ्या व्हेंचुरा या डोंगराळ प्रदेशात आणि व्हेंचुरा कंट्री येथे सर्वात जास्त नुकसान झाले आहे.बेल एअरमध्ये मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 4 / 5 लॉस एंजल्स पोलिसांनी ब्रेन्टवूड येथील पोलिसांना आपली घरे मोकळी करण्याचे आदेश दिले असून अनेक गावांमधील नागरिकांनी कालपासून घरे मोकळी करण्यास सुरुवात केली आहे. 5 / 5 या वणव्याला नैसर्गिक संकट म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणखी वाचा