शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

९ ते ५ वाल्यांची नोकरी धोक्यात? Linkedin च्या संस्थापकाची भविष्यवाणी व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 3:01 PM

1 / 8
तुमची ९ ते ५ या वेळेतील नोकरी धोक्यात आहे का? कारण लिंक्डइनचे सह-संस्थापक रीड हॉफमन यांनी नुकतेच एक भाकीत केले आहे की सन २०२३ पर्यंत ९ ते ५च्या नोकऱ्या संपतील.
2 / 8
लिंक्डइन सह-संस्थापकांचा असा दावा आहे की AI आजच्या कामात व्यत्यय आणत आहेत आणि जगभरातील जुनी जॉब सिस्टम हळूहळू नष्ट करत आहेत.
3 / 8
हॉफमन यांच्या मते, AI ची वाढती शक्ती आणि तंत्रज्ञानाचे वेगाने बदलणारे स्वरूप यामुळे कंपन्यांना नव्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे.
4 / 8
या तंत्रज्ञानामुळे कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत बदल होणार आहे. हॉफमन यांच्या या भाकितावर नेटकरी याला भविष्यातील वास्तव मानत आहेत, तर काहीजण याकडे केवळ एक शक्यता म्हणून पाहत आहेत.
5 / 8
लोकांना भविष्यात नोकऱ्या मिळतीलच असे नाही. त्यांनी फ्रीलान्स म्हणजेच गिग इकॉनॉमीमध्ये काम केले पाहिजे. म्हणजे लोक एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये करारानुसार काम करतील, असे रीड हॉफमन म्हणाले.
6 / 8
मात्र यामुळे नोकरीची सुरक्षितता कमी असेल. पण यामुळे तुम्हाला कामासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. तुमच्या व्यवसायात, कामातही लवचिकता राहील.
7 / 8
शेअरिंग इकॉनॉमी आणि एआयची कल्पना हॉफमन यांनी १९९७ मध्येच केली होती. ChatGPT आल्याने अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार असल्याने अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एआय तंत्रज्ञानासह काम करण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
8 / 8
हॉफमन यांच्या भाकि‍तांनी याआधी सिद्ध केले आहे की ते तांत्रिक आणि सामाजिक बदल समजून घेण्यात आणि भाकीत करण्यात तज्ञ आहेत. त्याच्या प्रत्येक भाकिताने इंटरनेट आणि तंत्रज्ञान जगताला नवी दिशा दाखवली आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानjobनोकरीArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स