This will be a sign of mass destruction on earth once again
पृथ्वीवर पुन्हा एकदा सामुहिक विनाशाचे संकेत, हे ठरेल कारण By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 11:59 AM1 / 10आपल्या सूर्यमालेतील एकमेव जिवंत ग्रह असलेल्या पृथ्वीवर उत्क्रांती आणि विनाशाची प्रक्रिया सुरुवातीपासूनच चालत आलेली आहे. मात्र अशा भीषण संहारानंतर पुन्हा एकदा पृथ्वीवर जीवन फुलले आहे. सुमारे ६.६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक लघुग्रह धडकला होता. त्यावेळी पृथ्वीवरील सुमारे ७५ टक्के जीवन नष्ट झाले होते. तसेच अनेक वर्षा पृथ्वी धुराच्या लोटात झाकली गेल्याने सूर्याची किरणेसुद्धा पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नव्हती.2 / 10सुमारे ६.६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक लघुग्रह धडकला होता. त्यावेळी पृथ्वीवरील सुमारे ७५ टक्के जीवन नष्ट झाले होते. तसेच अनेक वर्षा पृथ्वी धुराच्या लोटात झाकली गेल्याने सूर्याची किरणेसुद्धा पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नव्हती.3 / 10 मात्र या घटनेपूर्वीही एक मोठा आघात पृथ्वीवर झाला होता. तेव्हा संपूर्ण पृथ्वीवरील वृक्षवेली आणि समुद्री जीव नष्ट झाल होते. आता पुन्हा एकदा तसा आघात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. 4 / 10सुमारे ३६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील वृक्षवेली आणि समुद्री जीवजंतू नष्ट झाले होते. त्याला कारण ठरले होते ते पृथ्वीवरील वातावरणात वरच्या थरावर असलेल्या ओझोन वायूच्या आवरणाला पडलेले भगदाड. सायन्स ए़डवांसेस नावाच्या मासिकात प्रकाशित झालेल्या एका नव्या संसोधनामधून ही माहिती समोर आली आहे. 5 / 10सुमारे ३६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या वातावरणात असलेल्या ओझोन थराला पडलेल्या भगदाडामुळे स्वच्छ पाण्यात असलेले जीव, वृक्षवेली, समुद्रातील जीवजंतू सर्व नष्ट झाले होते. पृथ्वीवर सर्वत्र आगच आग होती. त्यामुळे वातावरण्यात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती. 6 / 10तज्ज्ञांना काही जुना दगडांना असलेल्या छिद्रांमध्ये काही सुक्ष्म वनस्पती सापडल्यानंतर हे संशोधन करण्यात आले. जेव्हा या वनस्पतींचा अधिक अभ्यास करण्यात आला तेव्हा ही माहिती समोर आली. सापडेलेल्या वनस्पतींपैकी काही रोपे व्यवस्थित होती. मात्र काही वनस्पती जळून होरपळून गेलेल्या आढळल्या. 7 / 10शास्त्रज्ञांनी जेव्हा यापैकी खराब झालेल्या रोपांच्या डीएनएचा अभ्यास केला तेव्हा ही रोपटी सूर्याच्या अल्ट्राव्हायोटेल (अतिनिल) किरणांमुळे जळून खाक झाल्याचे किंवा खराब झाल्याचे समोर आले. वातावरणातील जे ओझोनचे आवरण आपल्याला हानिकारक अतिनिल किरणांपासून वाचवते ते नष्ट झाल्याने यापूर्वी एवढा मोठा विध्वंस घडला आहे, ही बाब समोर आल्यानंतर मात्र शास्त्रज्ञांना धक्का बसला आहे. 8 / 10ओझोनच्या आवरणाला भगदाड पडल्याने वाढलेल्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागात ज्वालामुखीय हालचाली वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी ज्वालामुखींचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता. तसेच त्यानंतर संपूर्ण जगात केवळ विनाश दिसत होता, असेही याबाबत केलेल्या अधिक अभ्यासातून समोर आले आहे. 9 / 10पृथ्वीचे वातावरण प्रचंड वाढल्यानंतर अचानक पृथ्वीवर हिमयुग सुरू झाले. त्यामुळे हवामान थंड होऊ लागल्याने जगात पुन्हा एकदा जीवन नांदू लागले. 10 / 10आता पुन्हा एकदा ओझोनच्या थरात अशा प्रकारचे भगदाड पडल्यास ३६ कोटी वर्षांपूर्वी जसा विनाश झाला तसा संहार पुन्हा एकदा होऊ शकतो. त्यानंतर कुणीही पृथ्वीला वाचवू शकणार नाही, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications