शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुतीन यांना अटक होईल का? ICC ने आजपर्यंत कुणावर केलीय अशी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 1:29 PM

1 / 10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांविरुद्ध आंतरराष्ट्रीयने न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय पातळीवर या आदेशाची चर्चा रंगली आहे.
2 / 10
'रशिया इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा सदस्य नाही. त्यामुळे कायदेशीररित्या कोर्टाचा निर्णय आम्हाला लागू होत नाही. आम्ही कोर्टाला कोणतेही सहकार्य करणार नाही.
3 / 10
हा निर्णय अवैध असून आम्हाला अमान्य आहे', अशा शब्दात रशिया परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी भूमिका स्पष्ट केली.
4 / 10
२००२ साली स्थापन झालेलं हे कोर्ट गुन्हेगारी, मानवतेवरील संकट, नरसंहार आणि दंगल व युद्धसंबंधित आरोपीवर कारवाई करते. जवळपास सर्वच देशातील न्यायप्रक्रियेतूनही ही कारवाई होते.
5 / 10
मग, आसीसीसीचे वेगळेपण काय, त्याचंही उत्तर आहे. जर एखादा देश देशातील आरोपीवर कारवाई करत नसेल, तर आंतराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट म्हणजे आयसीसी याप्रकरणात लक्ष घालते.
6 / 10
जगभरातील १२३ देश आयसीसीचे सदस्य असून अनेक प्रमुख देश सदस्य नाहीत. त्यामध्ये, भारत, चीन आणि अमेरिकेसारखे देश आयसीसीचे सदस्य नाहीत. तर, ज्या व्लादीमीर पुतीन यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आलंय, तो रशिया देशही सदस्य नाही.
7 / 10
संयुक्त राष्ट्राशीही या संस्थेचा संबंध नाही, याशिवाय केवळ २००२ नंतर आलेल्या खटल्यांनाच या कोर्टात लढविता येणार आहे. त्यामुळे, या कोर्टाचं तितकच महत्त्व आहे.
8 / 10
आयसीसीने पुतीन यांच्याविरुद्ध वॉरं जारी केलंय, पण त्यांच्याकडे स्वत:ची पोलीस यंत्रणा नाही. एखाद्या अटकेसाठी ते संपूर्ण सदस्य देशातील पोलीस यंत्रणेवर अवलंबून आहेत.
9 / 10
त्यामुळे, पुतीन यांच्या अटकेची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण, जर पुतीन आयसीसीचे सदस्य असलेल्या एखाद्या देशात गेले तरच तेथील पोलिस यंत्रणा या वॉरंटचा आधार घेत पुतीन यांना अटक करु शकते.
10 / 10
पण, त्यासाठीही कायदेशीर प्रक्रिया आहे. दरम्यान, गेल्या २१ वर्षात आयसीसीने कुठल्याही देशाच्या बड्या नेत्याला किंवा ताकदवर व्यक्तीला अटक केली नाही.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनCourtन्यायालयrussiaरशिया