Willingness to marry his own child, rushed to court for permission
अजबच! स्वत:च्या अपत्यासोबत विवाह करण्याची इच्छा, परवानगीसाठी घेतली कोर्टात धाव By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 12:53 PM1 / 8स्वत:च्याच अपत्याशी विवाह करण्याची इच्छा असलेल्या एका व्यक्तीने या विवाहाला परवानगी देण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक व्यभिचाराबाबत तयार करण्यात आलेले कायदे रद्द होताना आपल्याला पाहायचे आहेत, असे या व्यक्तीने म्हटले आहे. त्यासाठी विवाह हा संबंधित व्यक्तींचा खासगी निर्णय असतो, असा दावा या व्यक्तीने केला आहे. 2 / 8न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार ही व्यक्ती आपली ओळख जाहीर करण्यास इच्छुक नाही. कारण कोर्टामध्ये त्या व्यक्तीने केलेला दावा नैतिकदृष्या आणि सामाजिक दृष्ट्या निंदनीय समजला जाऊ शकतो. मात्र या व्यक्तीने आपले अपल्य हे सज्ञान असल्याचे म्हटले आहे. 3 / 8यासंदर्भात कोर्टात दाखल झालेल्या कागदपत्रांमध्ये या व्यक्तीचे आणि त्याचा अपत्याचे लिंग गुप्त ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांचा पत्ता आणि इतर माहितीचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. या प्रकरणामधील व्यक्तीने सांगितले की तिची आपल्या अपत्याला प्रपोझ करण्याची इच्छा आहे. मात्र सामाजिक भीतीमुळे आपल्याला असे करता येत नसल्याचे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे. 4 / 8अपत्यासोबत विवाह केल्यास समाजामधून आपल्यावर बहिष्कार घालण्यात येईल, अशी भीती या व्यक्तीला वाटते. कुठल्याही परिस्थितीत आपल्या अपत्याला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी या व्यक्तीची इच्छा आहे. 5 / 8त्यामुळे या व्यक्तीने एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात मॅनहॅटन फेडरल कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. पालक आणि त्यांच्या अपत्यांच्या विवाहाबाबत असलेल्या कायद्यांना असंवैधानिक घोषित करावे, कारण ही बाब वैयक्तिक स्वायत्ततेशी संबंधित आहे, असा दावा या व्यक्तीने केला आहे. 6 / 8कोर्टात पाठवलेल्या याचिकेत या व्यक्तीने म्हटले आहे की, विवाह दोन व्यक्तींमधील खूप खास नाते असते. त्याला इंटिमेसी आणि अध्यात्माच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. न्यूयॉर्कमधील कायद्यांनुसार आपल्याच कुटुंबातील व्यक्तीसोबत विवाह केल्यास चार वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 7 / 8१९९२ मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक वुडी एलन यांनी आपल्या दत्तक घेतलेल्या मुलीसोबत अफेअर असल्याचे कबूल केले होते. त्यावेळी वुडी यांचे वय ५६ आणि त्यांच्या सावत्र मुलीचे वय २१ वर्षे होते. वुडी यांच्या या घोषणेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. 8 / 8मात्र प्रचंड टीकेनंतरही वुडी आणि त्यांच्या सावत्र मुलीने विवाह केला होता. या जोडप्याने नंतर दोन मुलांना दत्तकही घेतले होते. तसेच ते अजूनही एकत्र राहत आहेत. मात्र आता न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेले हे प्रकरण वेगळे आहे. कारण न्यूयॉर्कमधील ही व्यक्ती आपल्या जैविक अपत्यासोबत विवाह करू इच्छित आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications