woman gives birth to 6 kg baby, Arizona couple witness bundle of joy
तब्बल ६ किलो वजनाचं बाळ, अनेकदा गर्भपात झाल्यानंतर जोडप्याच्या आयुष्यात घडला चमत्कार By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 6:58 PM1 / 10Arizona येथील बॅनर थंडरबर्ड मेडिकल सेंटरमध्ये ४ ऑक्टोबर रोजी जन्म झालेल्या एका चिमुकल्याने सर्वांनाच हैराण केलं.2 / 10कॅरी पटोनाइने (Cary Patonai) ३८ आठवड्यांच्या प्रेग्नेंसीमध्ये तिसऱ्या मुलाला फिनली (Finnley) याला जन्म दिला. 3 / 10जन्म झाला त्यावेळी फिनलीचं वजन साडे सहा किलो होतं. त्यांची उंची २३.७५ इंच होती. 4 / 10या महिलेची डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, की २७ वर्षांच्या करियरमध्ये कधीही इतक्या मोठ्या मुलाला पाहिलं नाही.5 / 10कॅरी पटोनाइला अचानक लेबर पेन सुरू झाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ४ ऑक्टोबर रोजी कॅरीने ३८ आठवड्यांनंतर फिनलीला जन्म दिला.6 / 10कॅरीला सी सेक्शनसाठी नेण्यात आलं. त्यानंतर तिने साडे सहा किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला.7 / 10या बाळाचं वजन, त्याचा इतका मोठा आकार पाहून डॉक्टरही हैराण झाले. याआधी त्यांनी कधीही इतकं मोठं बाळ गर्भातून बाहेर येताना पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.8 / 10सर्वसाधारणपणे बाळाच्या जन्मावेळी त्याचं वजन जवळपास दोन ते अडीच किलो असतं. परंतु फिनलीचं वजन साडे 6 किलो होतं. त्याला पाहून सर्वच जण हैराण झाले.9 / 10फिनलीला पाहिल्यानंतर मेडिकल टीमला त्याच्यासाठी स्पेशल डायपर ऑर्डर करावे लागले, कारण त्यांच्याकडे डायपरची इतकी मोठी साइजच नव्हती.10 / 10फिनलीसाठी जन्मानंतर घालण्यासाठी लागणारे कपडेही पुन्हा आणावे लागले. ज्या साइजचे कपडे आणले होते, ते त्याला होत नसल्याने पुन्हा नवीन कपडे मागवावे लागले. आणखी वाचा Subscribe to Notifications