Woman stabs date during sex as revenge for 2020 killing of Iranian general Qasem Soleimani by US
ईराणी जनरलच्या मृत्यूचा असाही सूड, तरूणीने शारीरिक संबंध ठेवताना तरूणावर चाकूने केला हल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 11:10 AM1 / 7तीन जानेवारीला ईराणचे (Iran) इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्डचे कमांडर कासिम सुलेमानी (Qasem Soleimani) यांचा दुसरा स्मृतीदिन होता. सुलेमानी ३ जानेवारी २०२० मध्ये बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन ड्रोनच्या हल्ल्यात मारले गेले होते. त्यांच्या मृत्यूच्या साधारण दोन वर्षानंतर एका २१ वर्षीय तरूणी असा सूड उगवला ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. (Image Credit : nypost.com)2 / 7अमेरिकेच्या (America) लास वेगासमध्ये (Las Vegas) एका तरूणीने एका तरूणाला चाकूने मारून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. प्रकरणाची चौकशी करत असलेल्या पोलिसांनी सांगितलं की, एका २१ वर्षीय तरूणीने २०२० मध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारले गेलेल्या ईराणी जनरलच्या हत्येचा सूड घेण्यासाठी हॉटेलच्या रूममध्ये कथितपणे शारीरिक संबंध ठेवताना तरूणावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.3 / 7२१ वर्षीय Nika Nikoubin च्या हत्येचा प्रयत्नासहीत इतरही काही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्थानिक पोलिसांनी गुप्तचर खात्यालाही याची माहिती दिली आहे. मेल पार्टनरवर चाकूने हल्ला केल्यावर निका रूमच्या बाहेर पळाली. यादरम्यान तिने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की, तिने रूममध्ये एकावर हल्ला केलाय.4 / 7मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉटेलच्या रूममध्ये कपलने संबंध ठेवण्यास सुरूवात केली निकोबिनने लाइट बंद करण्याआधी तरूणाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. काही वेळाने तरूणाला त्याच्या गळ्यावर वेदना जाणवू लागली होती. तो जोरात ओरडला. त्याच्या लक्षात आलं की, तरूणीने त्याला दगा दिला. त्याने तिला धक्का दिला आणि लगेच ९११ नंबर डायल केला.5 / 7लास वेगास पोलिसांनी सांगितलं की निकोबिन या तरूणाला डेटिंग साइट प्लांटी ऑफ फिशवर भेटली होती. यावरून ओळख वाढल्यावर दोघांनी ५ मार्चला हेंडरसनच्या सनसेट स्टेशन हॉटेलमध्ये भेटण्याचा निर्णय घेतला. 6 / 7पोलिसांनी सांगितलं की, २१ वर्षीय निकाने २०२० साली अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारल्या गेलेल्या ईराणी सैन्य नेत्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी हे सगळं केलं. निकाने सांगितलं की, तिला या हल्ल्याची प्रेरणा एका मोटिवेशनल गाण्यातून मिळाली.7 / 7ईराणी जनरल सुलेमानी आणि इराकचे पॉप्युलर मोबिलायजेशन फोर्सेजे डेप्युटी कमांडर अबू महदी अल-मुहांडिस दोघेही बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारले गेले होते. तेव्हा अमेरिकेने दावा केला होता की, सुलेमानी अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करण्याचा प्लान करत होता. या हत्याकांडानंतर ईराणने अनेक अमेरिकेचा सूड घेण्याची शपथ घेतली आहे. पण निका निकोबिन नावाच्या तरूणीने असं काही केलं ज्यामुळे जगभरात ती चर्चेत आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications