शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या महिलेने बिघडवले भारत आणि नेपाळमधील संबंध, निर्माण झाला दोन्ही देशांत तणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 5:16 PM

1 / 10
भारतीय उपखंडात सांस्कृतिकदृष्या एकमेकांच्या अत्यंत जवळ असलेल्या भारत आणि नेपाळचे संबंध गेल्या काही काळात खूप बिघडले आहेत. नेपाळने भारताच्या हद्दीतील भूभागावर दावा केल्यानंतर भारताकडूनही नेपाळला परखड उत्तर देण्यात आले आहे.
2 / 10
दरम्यान, नेपाळ भारतापासून दूर होत चीनच्या अधिक जवळ जाण्यामागे अनेक राजनैतिक कारणे आहेत. त्याबरोबरच नेपाळला भारतापासून दूर करून चीनच्या बाजूला वळवण्यामध्ये एका महिलेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
3 / 10
या महिलेचे नाव आहे होऊ यान्की. होऊ यान्की या चीनच्या नेपाळमधील राजदूत असून, त्यांनीच आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर नेपाळला चीनच्या पारड्यात ओढले आहे. होऊ यान्की या नेपाळमध्ये खूप सक्रीय असून, त्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीद्वारे नेपाळमध्ये चीनची पाळेमुळे भक्कम केली आहेत.
4 / 10
भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी नेपाळच्या कारवायांना चीनची फूस असल्याचे विधान काही दिवसांपूर्वी केले होते. होऊ यान्की यांनी हा आरोप फेटाळून लावताना नेपाळचा बचाव करत नरवणे यांना प्रत्युत्तर दिले आहे. नेपाळ सरकारने सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय संरक्षणासाठी जनभावनांचा आदर करून हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
5 / 10
नेपाळच्या राजकारणासोबतच नेपाळच्या सांस्कृतिक जगतातही होऊ यान्की सक्रीय असतात. त्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. तसेच नेपाळच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी फोटोसेशनसुद्धा करत असतात.
6 / 10
होऊ यान्की या नेपाळमध्ये सध्या सत्तेवर असलेल्या केपी ओली सरकारसाठी अनेकदा संकटमोचक ठरल्या आहेत. २०१८ मध्ये नेपाळमध्ये चीनच्या राजदूत म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यापासून नेपाळ चीनच्या अधिकच जवळ गेला आहे.
7 / 10
जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव हा चीनमधून झाला असला तरी या काळाचा नेपाळी लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम होऊ यान्की यांनी केले. कोरोनाच्या काळात मदतीच्या बहाण्याने त्यांनी नेपाळमधील लष्कर, सरकार आणि सर्वसामान्यांपर्यंत थेट संपर्क प्रस्थापित केला. तसेच कामकाजात सहकार्याचा देखावा करून विविध मंत्रालये विभागाच्या कामांमध्येही उपस्थिती दर्शवली. तसेच विविध राजकीय पक्षांशीही संबंध प्रस्थापित केले.
8 / 10
कम्यनिस्ट पक्षामध्ये निवडणूकपूर्व आघाडी करवण्यात आणि यूएमएल-माओवादी यांचे ऐक्या घडवून आणण्यात होऊ यान्की यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओली सरकार अडचणीत आले असताना तसेच पक्ष फुटीच्या मार्गावर आलेला असताना त्यांनीच पक्षाला फुटीपासून वाचवले.
9 / 10
होऊ यान्की या १९९६ पासून चीनच्या परराष्ट्र खात्यात कार्यरत आहेत. त्या दक्षिण आशियाबाबतच्या उपमहासंचालक पदावर राहिलेल्या आहेत. तसेच अमेरिकेतील लॉस एन्जलिस येथे चीनच्या कॉन्सुलेट जनरल म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
10 / 10
नेपाळमध्ये येण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानमध्ये चीनच्या राजदूत म्हणून काम पाहिले आहे. चिनी आणि इंग्रजीशिवाय हिंदी आणि उर्दू भाषेवर त्यांचं प्रभूत्व आहे. तसेच नेपाळी भाषा समजून घेऊ त्याचे उत्तरही त्या देऊ शकतात. गेल्या काही काळात नेपाळला चीनच्या जाळ्यात ओढण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही.
टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय