Workers' agitation against the government in France
फ्रान्समध्ये सरकारविरोधात कामगारांचे आंदोलन By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 6:06 PM1 / 7फ्रान्समध्ये कामगार कायद्यात सुधारणा करण्यात येत आहे. त्याविरोधात येथील नॅन्टेसमध्ये अनेक संघटनांनी आंदोलन केले. 2 / 7यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.3 / 7तसेच, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 4 / 7फ्रान्सचे नवनिर्वाचित राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रोन यांच्या सरकारविरोधात हे पहिलेच आंदोलन आहे. 5 / 7सरकारच्या या निर्णयाविरोधात रेल्वे कर्मचारी, डावे पक्ष आणि अनेक कामगार संघटना उतरल्याने अनेक ठिकाणचे कामकाज ठप्प झाले. 6 / 7याचबरोबर, या आंदोलनामुळे फ्रान्समध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.7 / 7कामगार कायद्यातील प्रस्तावित सुधारणांमध्ये आर्थिक अडचणीत आलेल्या कंपन्यांना गरजेनुसार कामगारांना काढून टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अनेक संघटनांनी याला विरोध दर्शविला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications