आशेचा किरण! कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही, WHO ने दिला मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 16:06 IST
1 / 14कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल सहा कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. 2 / 14अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 3 / 14कोरोना व्हायरसवर जगभरात संशोधन सुरू असून लसीच्या चाचणीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी कोरोनासंदर्भात मोठं विधान केलं आहे.4 / 14कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही असं विधान जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी केलं आहे. यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.5 / 14अनेक देशांमध्ये लसींवर काम सुरू आहे. काही ठिकाणी कोरोना लस ही तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यांचे परिणाम पाहिले तर आता आपण कोरोना महामारी संपेल असं स्वप्न पाहण्यास हरकत नाही असं मत टेड्रोस यांनी म्हटलं आहे.6 / 14प्रगत आणि श्रीमंत देशांनी लसीच्या आशेवर गरीब आणि मागास देशांना ठेवू नये असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. 7 / 14'कोरोना काळात जगाने माणसाची चांगली रुपं पाहिली आहेत तशीच वाईटही रुपं पाहिली आहेत. मात्र ही महामारी संपली तरीही गरीबी, भूक आणि असमानता असं मुद्दे असणार आहेत.'8 / 14कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक लोकांचे मृत्यू झाले आहेत. तसेच संक्रमणही पूर्णपणे संपलेलं नाही त्यामुळे काळजी घ्यावी लागणार असल्याचं देखील टेड्रोस यांनी म्हटलं आहे.9 / 14WHO चे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी केलेल्या या विधानामुळे कोरोनाच्या संकटात आशेचा किरण दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. 10 / 14कोरोनावरील लस आल्यानंतर सावध राहणं गरजेचं असल्याचं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. कोरोनाची चाचणी करणं, लक्षणं आढळल्यास स्वत: ला आयसोलेट करणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.11 / 14टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलं होतं. आल्याने मी सेल्फ क्वारंटाईन केलं आहे अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली होती.12 / 14'आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. असं केले तरच आपण कोरोना संसर्गाची ही साखळी तोडू शकतो व कोरोनावर मात करू शकतो. तसेच आरोग्य प्रणालीचे रक्षणही करू शकणार आहोत' असं देखील त्यांनी म्हटलं होतं.13 / 14मॉडर्ना कंपनीनं दिलासादायक माहिती दिली आहे. मॉडर्ना कंपनीनं तयार केलेली कोरोनावरील लस 94.5 टक्के यशस्वी ठरली आहे. मॉडर्ना कंपनीची लस तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यातील सुरुवातीचे निष्कर्ष हाती आले आहेत.14 / 14कोरोना लसीचं वितरण सुरू करण्यापूर्वी अधिक माहिती उपलब्ध होणं गरजेचं आहे. कोरोना लसीच्या सुरक्षेशी संबंधित अधिक माहिती मिळाल्यानंतरच नियामकांकडून लसींना मंजुरी मिळते. नियामकांनी लवकर परवानगी दिल्यास डिसेंबरपासून अमेरिकेत दोन्ही लसींचा आपत्कालीन वापर सुरू होईल.