worlds biggest navy is in china eyes bases in pak lanka myanmar
चीनकडे जगातील सर्वात मोठं नौदल सामर्थ्य, भारताला घेरण्याच्या तयारी By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 3:14 PM1 / 12चीनने आपल्या नौदलाला जगातील सर्वात मोठे नौदल बनवले आहे. गेल्या काही वर्षांत चीननं आपली नौदल ताकद कैकपटीनं वाढविली आहे. त्याचबरोबर तो आता भारताला घेरण्याच्या तयारीत आहे. 2 / 12पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमारमध्ये आपली नौदल तळं तयार करावीत, अशी चीनची इच्छा आहे.3 / 12एवढेच नाही तर त्याला इंडो-पॅसिफिक प्रदेशातही आपला नौदल तळ बनवायचा आहे. हिंदी महासागरात चीन आपली नौदल संख्या वेगाने वाढवत आहे. त्यामुळे भारतही सतर्क झाला आहे. 4 / 12भारतीय नौदलाबद्दल बोलायचं झाल्यास भारताकडे एक विमानवाहू युद्धनौका आहे. एक उभयचर ट्रान्सपोर्ट डॉक, 8 लँडिंग शिप टँक्स, 11 डिस्ट्रॉयर, 13 फ्रिगेट्स, 23 कॉर्वेट्स, 10 मोठ्या ऑफशोर पेट्रोल जहाजं, 4 फ्लीट टँकर आणि इतर वाहनं आहेत. भारतात फक्त 15 इलेक्ट्रिक-डिझेलवर चालणार्या पाणबुड्या आणि 2 अणु पाणबुड्या आहेत. (PHOTO COURTESY- China Military)5 / 12चीनकडे सध्या 350 युद्धनौका आणि पाणबुडी आहेत. त्यापैकी 130हून अधिक सरफेस कॉम्बेटेंट्स आहेत. अमेरिकेकडे फक्त 293 युद्धनौका आहेत. अमेरिकन युद्धनौका चीनपेक्षा आधुनिक आहेत. (PHOTO COURTESY- China Military)6 / 12अमेरिकेत 11 विमानवाहू युद्धनौका आहेत, त्यापैकी प्रत्येकात 80 ते 90 लढाऊ विमान तैनात करता येतील. तर चीनकडे केवळ दोन विमानवाहू युद्धनौका आहेत.(PHOTO COURTESY- China Military)7 / 12पेंटागॉनच्या एका अहवालात असे म्हटले आहे की, चीन देशभरातील डझनभराहून अधिक देशांमध्ये सैन्य तळ तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या काही वर्षांत अण्वस्त्रांची संख्या दुप्पट करण्याचे चीनचे लक्ष्य आहे. पेंटागॉनच्या अहवालानुसार चीन थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती, केनिया, सेशेल्स, टांझानिया, अंगोला आणि ताजिकिस्तानमध्ये आपले तळ उभारण्याच्या प्रकल्पांवर काम करीत आहे.(PHOTO COURTESY- China Military)8 / 12अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने सैन्य व सुरक्षा घडामोडींचा पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना -2020 चा वार्षिक अहवाल अमेरिकन कॉंग्रेसला सुपूर्द केला आहे. या अहवालात असे स्पष्टपणे सांगितले आहे की, हे संभाव्य चिनी अड्डे जिबुती येथील चिनी सैन्य तळाच्या व्यतिरिक्त आहेत, ज्यांचे उद्दिष्ट नौसेना, हवाई दल आणि भूगर्भ दलाच्या कामकाजांना अधिक बळकटी देण्याचे आहे.9 / 12चीनचे सैन्य आपल्या लष्करी तळांच्या नेटवर्कद्वारे अमेरिकन सैन्याच्या कार्यात हस्तक्षेप करू शकते. संपूर्ण जगामध्ये चीन अमेरिकेविरुद्धची आपली स्थिती बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. चीनने यापूर्वी नामिबिया, वानुआतू आणि सोलोमन बेटे ताब्यात घेतली आहेत. इथेही तो आपली लष्करी ताकत वाढवत आहे.10 / 12चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी(पीएलए)कडे सध्या सुमारे 200 आण्विक शस्त्रास्त्रे आहेत. परंतु भविष्यात जमीन, पाणबुड्या आणि लढाऊ विमानांतून सोडण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांची संख्या वाढवत आहे. सध्या चीन अण्वस्त्रवाहक हवाई-प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नाही, त्यावर तो काम करत आहे. 11 / 12येत्या 10 वर्षांत चीन आपली आण्विक शक्ती दुप्पट करेल. म्हणजेच त्यात दुहेरी अण्वस्त्रे असतील. अमेरिकेने प्रथमच चिनी शस्त्रास्त्रांची संख्या सार्वजनिक केली. त्याचबरोबर शस्त्रास्त्रांच्या संख्येसह चीनची अणु विकास कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे ही चिंतेची बाब आहे.12 / 12पेंटागॉनने म्हटले आहे की, विकासासाठी जागतिक वाहतूक आणि व्यापार संबंध वाढविण्यासाठी आणि त्याचे धोरण यशस्वी करण्यासाठी चीन 'वन बॉर्डर वन रोड' (ओबीओआर)चा आधार घेतोय. चिनी सैन्याच्या वार्षिक अहवालात पेंटागॉनने अशी भीती व्यक्त केली आहे की, जागतिक महासत्ता होण्यासाठी चीन हे करत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications