शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इथे सापडले 1000 वर्षे जुने जगातील सर्वात मोठे भूमिगत शहर, एका कोंबडीमुळे लागला शोध...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 2:23 PM

1 / 9
Story Behind the Underground Cities in Turkey: तुम्ही जगातील सर्वात जुनी शहरांबाबत ऐक किंवा पाहिलं असेल. परंतु तुर्कस्तानमध्ये नुकतेच सापडलेल्या जगातील सर्वात मोठ्या आणि भूमिगत शहराबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
2 / 9
हे भूमिगत शहं इतके मोठे आहे की, सुमारे 20 हजार लोक अगदी आरामात एकत्र राहू शकतील. या जुन्या भूमिगत शहरामध्ये 200 हून अधिक वस्त्या अशल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात येतोय.
3 / 9
'द सन'मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तुर्कीतील कॅपाडोशियामध्ये डेरिंक्यु नावाचा बोगदा सापडला आहे. यामध्ये हे संपूर्ण शहर सामावलेले आहे. 11 स्तरांमध्ये बांधलेल्या या बोगद्याला 600 प्रवेशद्वार आहेत. या भूमिगत शहरात लोकांची आलिशान घरे, सामुदायिक इमारती, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, चर्च आणि अगदी स्मशानभूमीदेखील आहे.
4 / 9
इथे अनेक उंच इमारती होत्या, त्यावर जाण्यासाठी पायऱ्याही बनवल्या आहेत. प्रवेशद्वारावर दगडी दरवाजे बसविण्यात आले होते, जे दीड मीटर लांब आणि 200 ते 500 किलो वजनाचे होते.
5 / 9
हे भूमिगत शहर सापडण्याची कहाणीही खूप रंजक आहे. 1963 मध्ये पहिल्यांदा लोकांना या शहराची माहिती झाली होती. त्यावेळी एका श्रीमंत माणसाची कोंबडी अचानक गायब झाली.
6 / 9
बराचवेळ शोधल्यानंतर त्याला त्याच्या तळघरात एक छिद्र दिसले. यानंतर त्या व्यक्तीने भिंत तोडली आणि त्याला मोठा बोगदा दिसला. पुढील खोदकाम पुरातत्वशास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली केले गेले आणि असे आढळून आले की येथे 500 हून अधिक बोगदे आहेत.
7 / 9
त्या बोगद्यांमध्ये भूमिगत घरे, रेशन गोदामे, शाळा, वायनरी, चर्च यांसारख्या गोष्टीही होत्या. हे संशोधन कार्य सुमारे 20 वर्षे चालले आणि त्यानंतर 1985 मध्ये डेरिंक्यूचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला.
8 / 9
असे म्हणतात की हजारो वर्षांपूर्वी येथे अतिशय शांतताप्रिय लोक राहत असत. जेव्हा तुर्क ओट्टोमन साम्राज्याच्या जुलमी शासकांनी आजूबाजूच्या प्रदेशांवर नाश करायला सुरुवात केली, तेव्हा जीव वाचवण्यासाठी त्या काळातील लोकांनी हे भूमिगत शहर बांधले आणि वसवले.
9 / 9
नंतर आपल्या संपूर्ण समुदायासह ते इथेच लपून राहिले. हे शहर कधी बांधले गेले, त्याच्या बांधकाम कालावधीबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. तरीही हजार वर्षे जुने शहर सांगितले जात आहे.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके