स्टारबक्सचा जगातला सर्वात मोठा कॅफे पाहिलात का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 3:20 PM
1 / 8 कॉफी आणि स्टारबक्स हे समीकरण संपूर्ण जगभरात पाहायला मिळातं. जपानची राजधानी टोकियोमध्ये स्टारबक्सनं जगातला त्यांचा सर्वात मोठा कॅफे सुरू केला आहे. 2 / 8 जपानमधील अनेक कॅफे आणि हॉटेल रोबोट्समुळे चर्चेत असताना आता भव्यदिव्य स्टारबक्स कॅफे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 3 / 8 जगातला सर्वात मोठा स्टारबक्स 32 हजार चौरस फूटांचा आहे. हा कॅफे चार मजल्यांचं आहे. 4 / 8 या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बेकरी आणि कॅफे आहे. 5 / 8 स्टारबक्सच्या दुसऱ्या मजल्यावर टीवना टी रुम आहे. हा जगातील सर्वात मोठा टीवना टी रुम आहे. या ठिकाणी 20 प्रकारचा चहा मिळेल. 6 / 8 तिसऱ्या मजल्यावर अरिविअमो कॉकटेल बार आहे. या ठिकाणी कॉफीपासून तयार होणारे पदार्थ मिळतील. 7 / 8 चौथ्या मजल्यावर रोस्टिंग फॅक्टरी आहे. या ठिकाणी स्टारबक्सचा सर्वात मोठा रोस्टर आहे. याशिवाय मोठा लॉन्ज एरियादेखील आहे. 8 / 8 स्टारबक्सच्या अगदी मोजक्या कॅफेंमध्ये रोस्टर आहे. त्यात आता टोकियोतील या कॅफेचा समावेश झाला आहे. रोस्टर असलेला हा स्टारबक्सचा पाचवा कॅफे आहे. आणखी वाचा