शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीननं उभारला जगातील सर्वाधिक लांब 3D प्रिंटेड ब्रिज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 6:52 PM

1 / 6
जगातील सर्वाधिक लांब 3D प्रिंटेड ब्रिज चीनमध्ये उभारण्यात आला आहे. शांघायमधील वाटसरूंसाठी हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलाची लांबी 26.3 मीटर आणि रुंदी 3.6 मीटर एवढी आहे. रोबोटिक आर्म्सच्या मदतीनं केवळ 19 दिवसांमध्ये हा पूल उभारण्यात आला आहे. यामध्ये 3D-प्रिंटेड 44 काँक्रीट ब्लॉकचाही वापर करण्यात आला आहे. हा पूल उभारण्यासाठी 2 लाख 70 हजार युआन (जवळपास 28.09 लाख रुपये) एवढा खर्च करण्यात आला आहे.
2 / 6
शांघायमधील Wisdom Innovation Parkमध्ये हा ब्रिज बांधण्यात आला आहे. चीनच्या 3D प्रिंटिंग म्युझिअमव्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक्सवर काम करणाऱ्या टॉप हायटेक कंपनीचं कार्यालयदेखील या पार्कमध्ये आहे. पुलावर पडणाऱ्या वजनाची नोंद ठेवण्यासाठी विशेष असे तंत्रज्ञानदेखील येथे उपलब्ध आहे. 3 डी तंत्रज्ञानाच्या आधारावर ब्रिज बांधण्यात आल्याने याचा खर्च 33 टक्के कमी झाला आहे.
3 / 6
Tsinghua Universityचे प्राध्यापक सू बिगुओ यांनी ब्रिजचा आराखडा तयार केला आहे. या ब्रिजची निर्मिती करण्यासाठी पॉलिथिलीन फायबर काँक्रिटचा वापर करण्यात आला आहे.
4 / 6
प्रोफेसर सू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3डी प्रिंटिंगच्या मदतीनं ब्रिजची निर्मिती केल्यास कामगारांची गरज कमी प्रमाणात लागते. यासोबत खूपच कमी कालावधीत ब्रिजची निर्मिती केली जाऊ शकते. आगामी काळात चीनमध्ये बऱ्याच गोष्टींची निर्मिती करण्यासाठी थ्री डी प्रिटिंग तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणात सुरू करण्यात येणार आहे.
5 / 6

6 / 6
आता थ्री डी प्रिटिंग तंत्रज्ञानाद्वारे घरनिर्मितीची तयारीदेखील सुरू झाली आहे.
टॅग्स :chinaचीनtechnologyतंत्रज्ञान