Worrying! ... then these animals will not be seen in the zoo
चिंताजनक!...तर प्राणिसंग्रहालयातही दिसणार नाहीत हे वन्यजीव By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 2:29 PM1 / 11मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाच्या होत असलेल्या अपरिमित हानीमुळे अनेक वन्यजीवांसमोर अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे. जगभरात पशुपक्ष्यांच्या सुमारे 27 हजार विविध प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे काही दुर्मीळ प्राणी आणि भावी पिढ्यांना प्राणीसंग्रहालयातही पाहायला मिळणार नाहीत. जाणून घेऊया अशा काही वन्यजीवांविषयी. 2 / 11इंडोनेशियात आढळणारी माकडाची ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या प्राण्याचा अधिवास असलेली जंगले ताडाच्या लागवडीसाठी तोडली जात आहेत. त्यामुळे या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 3 / 11वाघांची ही प्रजात जंगलातून जवळपास नामशेष झाली आहे. या या प्रजातीचे काही वाघ केवळ प्राणीसंग्रहालयात शिल्लक आहेत. 4 / 11 खवले मांजराच्या काही प्रजातीमधली सुंडा पँगोलीन ही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्याशिवाय चिनी पँगोलीनच्या अस्तित्वावरसुद्धा संकट आलेले आहे. 5 / 11गेंड्यांच्या अनेक प्रजाती आहेत. मात्र एकशिंगी गेंड्यांची प्रजाती दुर्मीळ आहे. इतर गेंड्यांपेक्षा ते आकारानेसुद्धा लहान असतात. दरम्यान या गेंड्यांपैकी काही गेंडे जावामधील उजुंग कुलोन नॅशनल पार्कमध्येच उरले आहेत. 6 / 11जंगलांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाल्याने सुमात्रामधील वैशिष्ट्यपूर्ण वाघांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 7 / 11चीन आणि मंगोलियामध्ये आढळणारे हे उंट विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. 8 / 11रशिया आणि कझाकिस्तानमध्ये आढळणारी हरणाची ही प्रजाती पर्यायवरणीय बदलांमुळे लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. 9 / 11भारतातील हिमालयीन क्षेत्रात आढळणारा हा बगळा आता लुप्त होण्याचा मार्गावर आहे. 10 / 11इराण, कझाकिस्तान आणि पूर्व युरोपच्या काही भागात आढळणारा हा मासा मोठ्या प्रमाणावर झालेल्या शिकारीमुळे विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. 11 / 11माकडांची ही प्रजाती नष्ट झाल्याचे मानण्यात येत होते. मात्र 2002 मध्ये या प्रजातीची काही माकडे उत्तर व्हिएतनाममधील जंगलात आढळली होती. त्यानंतर या माकडांच्या संवर्धनाबाबत आशा वाढली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications