Wuhan, Corona's second most dangerous center
इटलीमध्ये तयार होतंय वुहान, कोरोनाचं दुसरं सर्वात खतरनाक केंद्र, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 3:07 PM1 / 10कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. चीन अन् इटलीला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. चीनमध्ये सद्यस्थितीत 80,735 लोकांना संसर्ग झालेला आहे. तसेच 3119 जणांचा मृत्यू ओढावलेला आहे.2 / 10 इटलीमध्ये 7375 लोकांना संसर्ग झाला असून, चीननंतर सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये कोरोना व्हायरसनं आतापर्यंत 266 जणांचा मृत्यू झाला आहे3 / 10या जीवघेण्या व्हायरसचं दुसरं खतरनाक केंद्र म्हणून इटली समोर आलं आहे. पंतप्रधान जियुसेप्पे काँटे यांनी या देशातील अनेक भागात लॉकडाऊन केलं आहे. 4 / 10इटली सरकारच्या या आदेशानंतर लोम्बार्डी, मोडेना, पर्मा, पियासेंजा, रेजियो एमिलिया, रिमिनी, पेसारो, अर्बिनो, एलेसांड्रिया, अस्ती, नोवारा, वर्बानो-कुसियो-ओसोला, वर्सिली, पादुआ, ट्रेविसो आणि वेनिसमधील जवळपास 1.60 कोटी लोक नजरकैद झाले आहेत. 5 / 10रेल्वे, विमान आणि बस सारख्या अतिमहत्त्वाचा सेवाच फक्त सुरू आहेत. कोणीही क्वारंटिनच्या नियमांचं उल्लंघन केल्यास त्याला तीन महिने तुरुंगवास आणि 17,215 रुपये दंडाची रक्कम आणि दोन वर्षांची शिक्षा मिळू शकते. 6 / 10या देशातील बार आणि रेस्टॉरंट खुले आहेत. परंतु सरकारी आदेशानुसार एका टेबलापासून दुसऱ्या टेबलापर्यंतचं अंतर जवळपास तीन फूट आहे. 7 / 10इटलीच्या पर्यटकांना परत मायदेशी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी इटली सरकारने कठोर पावले उचलल्यामुळे रविवारी देशातील जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्येला घरातच थांबून राहावे लागले आहे.8 / 10 चीनच्या बाहेर कोविड-19चे सगळ्यात जास्त बळी इटलीतच झाले आहेत. व्हेनिस शहरात आणि आर्थिक राजधानी मिलानमध्ये मिळून 15 दशलक्ष (दीड कोटी) लोकांची घरे ही एकांतवासाची (क्वारंटाईन) बनली आहेत,9 / 10तर संपूर्ण देशभर चित्रपटगृहे, संग्रहालये बंद ठेवण्यात आली आहेत. अर्जेंटिना या लॅटिन अमेरिकन देशात कोरोना व्हायरसने पहिला मृत्यू झाला आहे.10 / 10या जहाजावरील १९ कर्मचारी आणि दोन प्रवाशांना या विषाणूची बाधा झाली आहे. जहाजावरील ४५ जणांची यासाठी तपासणी झाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications