Yearender 2020 five world changing events of this year
Flashback 2020 : जग बदलवून टाकणाऱ्या २०२० या वर्षातील ५ घटना By मोरेश्वर येरम | Published: December 24, 2020 1:47 PM1 / 5२०२० या वर्षात कोविड-१९ च्या उद्रेकानं संपूर्ण जग बदललं. या वर्षात कोट्यवधी लोकांना व्हायरची लागण झाली आणि लाखो लोकांचा मृत्यू या महामारीमुळे झाला. जगातील बहुतांश देशांना कडक लॉकडाऊन पाळावा लागला. यात कार्यालयं, वाहतूक व्यवस्था, शाळा, बाजार, महाविद्यालयं सारंकाही बंद ठेवावं लागलं. 2 / 5उत्तर कोरिआचा हुकूमशहा किम जोंग उन याचा ब्रेनहॅमरेजने मृत्यू झाल्याची अफवा सोशल मीडियात पसरली होती. किम जोंगच्यानंतर त्याची बहिण किम यो जोंग हिच्या समर्थनार्थ नेटिझन्स सक्रीय झाले होते. पण किम जोंग उन जिवंत असल्याचं नंतर निष्पन्न झालं आणि सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. 3 / 5पोलंडने त्याच्या शेजारी राष्ट्र असलेल्या झेक रिपब्लिकची जमीन चुकीने बळकावली असल्याची जाहीर कबुली दिली होती. पोलंडने झेक रिपब्लिकमधील एका चॅपलवर ताबा मिळवला होता. तसेच त्यांनी काही दिवस त्या ठिकाणी मुक्कामही केला होता. इतकंच नव्हे, तर पोलंडच्या सैनिकांनी झेक रिपब्लिकहून येणाऱ्या नागरिकांना आतही येऊ दिलं नव्हतं. 4 / 5अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनकडून UFO चे तीन व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा एलियनसबाबत चर्चा सुरू झाली होती. 5 / 5कोरोनाचं संकट कमी होतं की काय, अशातच पाकिस्तानच्या दिशेनं भारताकडे आलेल्या टोळधाडीनं सारंकाही उध्वस्त केलं. जुलै २०२० मध्ये पाकिस्तानातून राजस्थान आणि मध्यप्रदेश मार्गे आलेल्या टोळधाडींनी विदर्भातल्या नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात धडक दिली होती. संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचं या किटकांनी मोठं नुकसान केलं होतं. एका टोळधाडीत कोट्यवधी किटक असतात. अशाच प्रकारची टोळधाड आफ्रिकेच्या पश्चिम भागातही पाहायला मिळाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications