You will be amazed at the picturesque festivals, photos and traditions around the world
जगभरातले चित्र-विचित्र उत्सव, फोटो अन् परंपरा पाहून व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 3:12 PM1 / 5बेबी जंपिंग फेस्टिव्हल- लहान मुलांच्या वरून उड्या मारण्याचा हा अजब उत्सव आहे. स्पेनमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात लांबसडक व्यक्ती लहानग्यांच्या अंगावरून उड्या मारण्याचा प्रयत्न करतो. 2 / 5व्हेजिटेरियन फेस्टिव्हल- हा उत्सव थायलंडमध्ये साजरा केला जातो. उत्सवाचे फोटो पाहून हा किती भयानक असेल याची खात्री पटते. हे फेस्टिव्हलही नावाच्या विपरीत आहे. 3 / 5मच्छरांचं फेस्टिव्हल- टेक्सासमधल्या क्लूटमध्ये हा चित्रविचित्र उत्सव साजरा केला जातो. तीन दिवशीय या फेस्टिव्हलमध्ये चित्रविचित्र खेळ खेळले जातात. 4 / 5कोनकी सूमो फेस्टिव्हल- जपानच्या यामाजी मंदिरात या उत्सव साजरा केला जातो. कोनकी म्हणझे रडणं. सूमो लाकूड हातात घेऊन दोन लहान मुलं एकमेकांसमोर उभी राहतात. त्यानंतर एकमेकांना मारण्यास सुरुवात करतात. जो पहिल्यांदा जोरजोरात लढेल तो जिंकल्याचं घोषित केलं जातं. 5 / 5 बोलस दे फुएगो- हा उत्सव साल्वाडोरमध्ये साजरा केला जातो. नेजलातल्या एका छोट्या शहरातील लोक एकत्र येतात आणि एकमेकांवर आगीचे गोळे फेकतात. दोन गट एकमेकांवर गोळा फेक करत असून, त्यामुळे लोकांचं मनोरंजन होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications