शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दारु पिऊन-पिऊन कोमामध्ये गेलेली तरुणी; कोरोनाने तिचे वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 8:04 AM

1 / 10
कोरोना महामारीने अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. जगभरातील मोठमोठ्या देशांसह छोट्या देशांच्या अर्थ व्यवस्थांचे कंबरडे मोडले आहे. अशातच अनेकांचे आयुष्य देखील पूर्णपणे बदलले आहे. काहींना याचा फायदाही झाला आहे.
2 / 10
इंग्लंडमध्ये राहणाऱ्य़ा तरुणीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. ती तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये पार्टी गर्ल म्हणून फेमस होती.
3 / 10
अवघी २१ वर्षांची असलेली ओलिविया इबिटसन ही खूप दारू प्यायची. यामुळे तिची हालतही खराब होऊ लागली होती. कोरोना व्हायरसमुळे तिला नवीन आयुष्य मिळाले आहे.
4 / 10
ओलिविया हिने १५ वर्षांची असताना पहिल्यांदा दारू पिली होती. 18-19 च्या वयात येत असताना ती रोजच दारू पिऊ लागली. पार्टीला जाण्याआधी ती दोन वाईनच्या बॉटल संपवत होती. तिच्या या वागण्यामुळे तिचे मित्रांनी तिची साथ सोडली होती.
5 / 10
यामुळे ओलिवियाला या पार्ट्यांमध्ये नशा झाली की भीती वाटत असायची. दुसऱ्या दिवशीचा हँगओव्हर उतरविण्यासाठी फास्ट फूड खायची. यामुळे तिची लाईफस्टाईल खूप विचित्र झाली होती.
6 / 10
ओलिवियाला टाईप १ डायबिटीस होता. 2019 मध्ये तिची हालत खूप खराब होऊ लागली. एके दिवशी तिने खूप दारू पिली आणि तेव्हाच तिला निमोनियादेखील झालेला. क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये ती दोन दिवस कोमात गेली होती.
7 / 10
इग्लंडमध्ये मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे ल़ॉकडाऊन लागला. तेव्हा दारू, सिगरेट काय फास्टफुडही कुठे मिळत नव्हते. बेचैन झालेल्या ओलिवियाने आता बदलायचे ठरविले.
8 / 10
रोजच्या नशेतून शुद्धीत आल्यावर तिला जाणवले की वजन खूप वाढले आहे. ती म्हणते, मी पाहिले की काहीच उघडे नाहीय. पब, बार सगळे बंद होते. मी याचा फायदा उठवू शकते असे वाटले. मी केवळ पाणी आणि ग्रीन टी पिण्यावर लक्ष वळविले. तसेच हलका व्यायामही करायला सुरुवात केली.
9 / 10
आश्चर्याची बाब म्हणजे दारुमध्ये आकंठ बुडालेली ओलिवियाने गेल्या 10 महिन्यांपासून दारूचा थेंबही पिलेला नाहीय. यामुळे तिचे वजन खूप कमी झाले आहे. आता ती आपल्यासारख्य़ाच दुसऱ्या बिघडलेल्या लोकांना त्यांच्या सवयी बदलण्याचे सल्ले देत आहे.
10 / 10
ओलिविया म्हणते की, मी जेव्हा दारू प्यायची तेव्हा माझ्यासाठी डेटिंग हा ऑप्शन नव्हता. लॉकडाऊनमध्य़े मी एका व्यक्तीशी बोलू लागले. लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही भेटलो. आता मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या