this is the youngest nation in the world
जगातील सर्वात तरूण राष्ट्रप्रमुख By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:55 PM1 / 7गेल्या दोन दिवसांपूर्वी फिनलंडच्या पंतप्रधान म्हणून साना मरिन यांनी शपथ घेतली. तसेच, त्या सर्वात कमी वय असलेल्या पंतप्रधान आहेत. अशाच काही तरुण राष्ट्रप्रमुखांची माहिती आपण पाहूया....2 / 7फिनलंडच्या पंतप्रधान साना मरिन अवघ्या 34 वर्षांच्या आहेत. त्यांनी गेल्या मंगळवारी फिनलंडच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. एक तरुण महिला या देशाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे जगभरातून साना मरिन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.3 / 7युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होनारुक यांचे सुद्धा वय कमी आहे. ते 35 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म 7 जुलै 1984 रोजी झाला.4 / 78 जानेवारी 1983 मध्ये जन्मलेले किम जोंग-उन यांनी वयाच्या 36 व्या वर्षी उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विराजमान झाले.5 / 7लॅटीन अमेरिकेतील अल साल्वाडोरचे अध्यक्ष म्हणून नायब बुकेले जून 2019 पासून विराजमान आहेत. 38 व्या वर्षी त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.6 / 7हैतीचे पंतप्रधान म्हणून फ्रिट्स-विल्यम मिशेल यांनी वर्ष 2019 पासून पदभार सांभाळला. त्यांचा जन्म 23 जुलै 1980 असून पंतप्रधान असताना त्यांचे वय 39 होते. 7 / 7कोस्टा रिकाचे अध्यक्ष कार्लोस अल्वाराडो क्विसाडा हश 2018 पासून पदाची सुत्रे सांभाळतात. त्यांनी 39 व्या वर्षी पदाभार स्वीकारला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications