youth checking mail at midnight; won jackpot of Rs 75 crore
छप्परफाड! मध्यरात्री २ वाजता मेल आला; 75 कोटींचा जॅकपॉट लागल्याचे पाहताच झोप उडाली By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 9:01 AM1 / 10तुम्ही रात्री झोपेतून उठून मेसेज, मेल चेक करत असता आणि तुम्हाला अचानक करोडोंची लॉटरी लागली तर पुन्हा झोप येईल का? नाही ना. असाच प्रकार ऑस्ट्रेलियात घडला आहे. 2 / 10ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका व्यक्तीचा गुरुवारी लवकर डोळा लागला. रात्री लवकर झोपल्याने त्याला मध्यरात्री 2 वाजता जाग आली. यामुळे त्याने मेल चेक करण्याचा विचार केला. इथेच त्याचे नशीब पालटले. 3 / 10मेल चेक करताना त्याला काही लॉटरी लागेल याचा हासभासही नव्हता. त्याला एक मेल आला. त्यामध्ये त्याने काही दिवसंपूर्वीच काढलेल्या लॉटरीचा निकाल होता. 4 / 10या व्यक्तीने पॉवरबॉल लॉटरीमध्ये 10 दशलक्ष डॉलरचा जॅकपॉट जिंकला आहे. ब्रिस्बेनच्या सँडगेटमध्ये राहणारा हा व्यक्ती ट्रेडिंग करतो, गेल्या काही काळापासून तो लॉटरीमध्ये देखील पैसे लावत होता. 5 / 10या व्यक्तीला जेव्हा समजले की त्याने 10 दशलक्ष डॉलर म्हणजे 75 कोटी रुपये जिंकलेत तेव्हा त्याचा यावर विश्वासच बसत नव्हता. मात्र, हा विचार करता करता त्याची झोपच उडून गेली. 6 / 10या व्यक्तीला आधी त्याने 10000 डॉलर जिंकल्याचा समज झाला. तो खूश होता. परंतू त्याच्या मनात पाहिलेला आकडा काहीसा मोठा असल्याचे घोळू लागले. यामुळ त्याने पुन्हा मेल उघडून पाहिल तर ते 10 हजार नाही तर दहा दशलक्ष डॉलर होते. 7 / 10ही रक्कम या लॉटरीची सर्वात मोठी म्हणजेच पहिले बक्षिस होते. ही रक्कम १ कोटी डॉलर्स म्हणजेच 75 कोटी रुपयांच्या आसपास जाते. 8 / 10या व्यक्तीने सांगितले की, मी हा जॅकपॉट जिंकलो तरीही काम करत राहणार आहे. मी माझ्या कुटुंबालाही सांगितले आहे. मी काम केले नाहीत कंटाळेन. मात्र, हे पैसे जिंकल्याने माझ्यासमोरील अनेक समस्या दूर झाल्या आहेत. 9 / 10हा व्यक्ती आता त्याच्या आईवडिलांसाठी एक घर घेण्याचा विचार करत आहे. माझ्या मनात अनेक योजना आहेत, परंतू मी सध्या त्याचा विचार करू शकत नाहीय, असे तो म्हणाला. 10 / 10मला हे सारे स्वप्नासारखेच वाटत आहे, असेही तो म्हणाला. गेल्या वर्षी 14 पॉवरबॉल डिव्हीजन वनच्या विजेत्यांनी संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये 470 दशलक्ष डॉलर जिंकले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications