"आम्ही हे वावर विकत घेतलं नाही"; जरांगे पाटलांनी सभेचा हिशोबच दिला By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 1:40 PM
1 / 11 अंतरवाली सराटीतील सभेसाठी सात कोटी रूपये लागल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. शिवाय सभेत हिंसाचार होईल म्हणून मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. 2 / 11 या वक्तव्यांचा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी समाचार घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांना समज द्यावी, असेही जरांगे यांनी म्हटले. 3 / 11 आपल्या मुलांचे भविष्य सुखाचे घडवायचे असेल तर आज आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. आता मागे हटायचे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाने मराठा समाजाला हक्काचे आरक्षण देण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा. 4 / 11 मराठा समाजाने पुढील दहा दिवस गाफिल राहू नये. आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. उचकू नका उद्रेक व जाळपोळ करून नका. शांततेत आंदोलन करा. 5 / 11 आरक्षण मिळाल्याशिवाय मी माझ्या घरचा उंबरा शिवणार नाही. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, असा पुर्नरूच्चारही जरांगे यांनी केला. तसेच, ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार निशाणा साधला 6 / 11 जरांगे पाटील यांनी ७ कोटीचा आकडा कुठून आला, असा सवाल केला. आम्ही सभेसाठी वावर घेतलंय, ते विकत घेतलं नाही, तेही आम्हाला आमच्या माणसांनी फुकट दिलंय, असे पाटील यांनी म्हटले. 7 / 11 आम्ही गोदापट्ट्यातील १२३ गावांकडून पैसे गोळा केले आहेत. या १२३ गावांपैकी २२ गावातील लोकांनी पैसे दिले, तेच २१ लाख रुपये जमा झाले. अद्यापही १०१ गावांकडून पैसे येणार आहेत, ते त्यांच्याकडे जमा आहेत. पण, आपण तो पैसा घेतला नाही, अशी माहिती जरांगे पाटील यांनी जाहीर सभेतून दिली. 8 / 11 मराठा समाजाने पुढील दहा दिवस गाफिल राहू नये. आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. उचकू नका उद्रेक व जाळपोळ करून नका. शांततेत आंदोलन करा. 9 / 11 आरक्षण मिळाल्याशिवाय मी माझ्या घरचा उंबरा शिवणार नाही. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, असा पुर्नरूच्चारही जरांगे यांनी केला. तसेच, ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार निशाणा साधला 10 / 11 जरांगे पाटील यांनी ७ कोटीचा आकडा कुठून आला, असा सवाल केला. आम्ही सभेसाठी वावर घेतलंय, ते विकत घेतलं नाही, तेही आम्हाला आमच्या माणसांनी फुकट दिलंय, असे पाटील यांनी म्हटले. 11 / 11 जरांगे पाटील यांनी ७ कोटीचा आकडा कुठून आला, असा सवाल केला. आम्ही सभेसाठी वावर घेतलंय, ते विकत घेतलं नाही, तेही आम्हाला आमच्या माणसांनी फुकट दिलंय, असे पाटील यांनी म्हटले. आणखी वाचा