भीमा-कोरेगाव हिंसाचार : महाराष्ट्र बंद मुळे जळगाव जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 3:55 PM
1 / 10 महाराष्ट्र बंद दरम्यान बुधवारी दिवसभर कजगाव येथे व्यापाºयांनी आपली दुकाने बंद ठेवली. 2 / 10 जळगाव शहरातील प्रमुख मार्केट बंद होते. तोडफोड होऊ नये म्हणून जळगाव शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. 3 / 10 महाराष्ट्र बंद दरम्यान सर्वाधिक फटका हा एस.टी.महामंडळाला बसला. जळगाव बसस्थानकात अनेक फेºया रद्द करण्यात आल्या. बस स्थानकावर प्रवाशांअभावी शुकशुकाट होता. 4 / 10 महाराष्ट्र बंदमुळे अनेक प्रवाशांनी प्रवास टाळल्यामुळे जळगाव रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट होता. 5 / 10 जळगावातील सर्वाधिक वर्दळीचे महात्मा फुले मार्केट बुधवारी बंद होते. 6 / 10 अमळनेर येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी खाली पाडून नुकसान करण्यात आले. 7 / 10 अमळनेर शहरातील एका औषधीच्या दुकानावर दगडफेक करून नुकसान करण्यात आले. 8 / 10 भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध म्हणून अमळनेर येथे प्रातांधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 9 / 10 भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध म्हणून अमळनेर येथे मोर्चा काढण्यात आला. 10 / 10 भुसावळ येथे हल्लेखोरांनी फैजपूर बसवर दगडफेक करीत नुकसान केले. आणखी वाचा