10 century temple found in excavation of lingraj temple in bhubneshwar
खोदकामादरम्यान लिंगराज मंदिराजवळ सापडलं १० व्या शतकातील शिवलिंग; पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 2:16 PM1 / 8ओडिसाची राजधानी भुवनेश्वरमध्ये लिंगराज मंदिराजवळ उत्खननात एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. जे पुरावे १० व्या शतकातील असल्याचे सांगितले जात आहे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाद्वारे करण्यात आलेल्या खोदकामात हे आढळून आलं आहे. 2 / 8लिंगराज मंदिरात एका प्रकल्पाअंतर्गत उत्खनन आणि सौंदर्यीकरणाचे कार्य पुरातत्व विभागाद्वारे केलं जात आहे. यादरम्यान १० व्या शतकातील मंदिराचे अवशेष सापडले आहेत. खोदकामादरम्यान एक शिवलिंग सापडले असून ज्याच्या तळाला दगडात कलाकृती साकारण्यात आली आहे. 3 / 8पुरातत्व विभागानं दिलेल्या माहितीनुसार पंचायती मॉडलनं मंदिरात परिसराची पाहणी केली आहे. मुख्य मंदिराला चारही बांजूनी इतर मंदिरांच्या दालनांनी घेरले आहे. हे सोमवंश काळातील मंदिर आहे. आहे असं सांगितलं जात आहे.4 / 8खोदकामादरम्यान काही मूर्तींवर नक्षीकाम केलेले दिसून आले. या मूर्ती संस्कृत महाविद्यालयाच्या परिसरात दफन करण्यात आल्या होत्या. पुरातत्व विभागानं वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करून हे खोदकाम केले आहे. त्यामुळे मूर्ती खंडीत होण्यापासून वाचवता येऊ शकतात. 5 / 8आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे अधिक्षक अरूण मल्लिक यांनी दिलेल्या माहितीनुसार खोदकामादरम्यान अनेक प्राचीन मंदिरं दिसून आली आहेत. 6 / 8भितींच्या काही भागांमध्ये जुन्या राजघराण्यांमधील काही पुतळे दिसून आले आहेत. 7 / 8या मूर्ती आजही जशाच्या तशात आहेत. यावरून त्या काळातील रचना, बांधणी आणि कलाकृतींची कल्पना किती मजबूत असावी याचा अंदाज येतो.8 / 8या मूर्ती आजही जशाच्या तशात आहेत. यावरून त्या काळातील रचना, बांधणी आणि कलाकृतींची कल्पना किती मजबूत असावी याचा अंदाज येतो. आणखी वाचा Subscribe to Notifications