1200 rupees vegetable expensive than chicken mutton fish rot in two days
बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 1:25 PM1 / 10ही बहुधा देशातील सर्वात महाग भाजी आहे. ती फक्त श्रावण महिन्यात विकले जाते. तेही झारखंड आणि छत्तीसगड या दोन राज्यांत. त्या भाजीचे नाव दोन्ही ठिकाणी वेगवेगळे आहे.2 / 10खुखडी (Khukhadi) असे या भाजीचे नाव आहे. या भाजीची किंमत 1200 रुपये प्रति किलो आहे. मात्र, भाजी मार्केटमध्ये ही भाजी हाताने विकली जाते. या भाजीमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात.3 / 10छत्तीसगडमध्ये या भाजीला खुकडी म्हणतात. झारखंडमध्ये याला रुगडा म्हणतात. ही मशरूमची एक प्रजाती आहेत. ही भाजी खुखडी (मशरूम) आहे, जी जंगलात नैसर्गिकरित्या वाढते.4 / 10ही भाजी दोन दिवसात शिजवावी लागते, अन्यथा ती खराब होते. बलरामपूर, सूरजपूर, सुरगुजा, छत्तीसगडसह उदयपूरला लागून कोरबा जिल्ह्याच्या जंगलात पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी पाहायला मिळते.5 / 10दोन महिन्यांपर्यंत वाढणाऱ्या खुखडीची मागणी इतकी वाढते की जंगलात राहणारे ग्रामस्थ ते साठवून ठेवतात. छत्तीसगडमधील अंबिकापूरसह इतर शहरी भागात मध्यस्थी ही भाजी कमी किंमतीत विकत घेतात आणि ते 1000 ते 1200 रुपयांपर्यंत प्रतिकिलो विकतात. हंगामात दररोज अंबिकापूर बाजारात सुमारे पाच क्विंटल पुरवठा होतो.6 / 10खुखडी हा पांढर्या मशरूमचा एक प्रकार आहे. खुकडीच्या अनेक प्रजाती व वाण आहेत. लांब पट्ट्यातील सोरवा खुकडीला जास्त पसंती आहे. 7 / 10या भाजीला बोली भाषेत भूडू खुकडी असे म्हणतात. भुडू हे मातीचे घर किंवा टेकडी आहे जे दीमकांनी बांधले आहे, त्याठिकाणी ते पावसात वाढते. ही भाजी शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवते.8 / 10श्रावण महिन्यात झारखंडमधील अनेक लोक महिनाभर मांसाहार खात नाहीत. अशा परिस्थितीत दुर्गम भागातून येणारी खुकडी हा चिकन आणि मटणसाठी चांगला पर्याय बनला आहे. पण, यासाठी थोडासा खिसा मोकळा करावा लागतो. 9 / 10रांचीमध्ये ही भाजी प्रतिकिलो 700 ते 800 रुपये दराने विकली जाते. खुखडीचा उपयोग भाजीशिवाय औषधे बनवतानाही करण्यात येतो. 10 / 10असे मानले जाते की, पावसाळ्यामध्ये वीज कोसळल्याने पृथ्वीला भेगा पडतात. त्यावेळी पृथ्वीमधून पांढऱ्या रंगाची खुखडी बाहेर येते. स्थानिक मेंढपाळ करणाऱ्या लोकांना खुखडी भाजी कशी असते, याची चांगली जाण असते. त्यांना खुखडी कोठे सापडेल हे देखील ठाऊक असते. आणखी वाचा Subscribe to Notifications