समुद्रात सापडले 1300 वर्षे जुने व्यापारी जहाज, त्यात सापडलेल्या 200 भांड्यात नेमकं काय? पहा फोटो... By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 7:23 PM
1 / 6 शोधकर्त्यांना इस्रायलच्या किनारपट्टीवर 1,300 वर्षे जुन्या व्यापारी जहाजाचे अवशेष सापडले आहेत. विशेष म्हणजे, या जहाजात अंजीर आणि खजूर आढळून आले. जहाजात सुमारे 200 डिझायनर भांडी सापडली असून, त्यात माशाची चटणी आणि अनेक ड्रायफ्रूट्स सापडले आहेत. शोधकर्त्यांच्या मते, हे जहाज अक्रोडच्या लाकडापासून बनलेले आहे. जहाज सुमारे 25 मीटर (82 फूट) लांब असावे. 2 / 6 शोधकर्त्यांनी सांगितले की जहाज सायप्रस, इजिप्त, तुर्की किंवा उत्तर आफ्रिकेच्या किनारपट्टीवरून आले असावे. सागरी पुरातत्वशास्त्रज्ञ डेबोराह सिविकेल यांच्या म्हणण्यानुसार, या जहाजात व्यापार्यांच्या वैयक्तिक वस्तू जसे की, लाकडी कंगवा सापडला आहे. हे जहाज सापडल्यानंतर त्यांनी सांगितले की, धार्मिक विभागणी असूनही येथे व्यापार होत असे, याचा हा पुरावा आहे. 3 / 6 हे जहाज मालाने भरलेले असल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे, त्यामुळे सातव्या शतकात इस्लामिक साम्राज्याची स्थापना झाल्यानंतरही पश्चिमेकडील लोक येथे व्यापारासाठी येत होते, असा अंदाज शोधकर्ते व्यक्त करत आहेत. हे जहाज पूर्णपणे वाळूमध्ये गाडले गेले असून, त्यात अनेक भांडी असल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे. 4 / 6 शोधकर्त्यांनी सांगितले की हे व्यापारी जहाज त्या काळात पाइन आणि अक्रोडाच्या झाडांच्या लाकडापासून बनवले गेले होते. हे जहाज आताच्या इस्रायली मॅगन मायकलजवळ सापडले आहे. 1300 वर्षापूर्वी किंवा त्याआधी मोठ्या ख्रिश्चन साम्राज्य या प्रदेशावरील आपली पकड गमावत होते आणि इस्लामिक राजवट आपला विस्तार वाढवत होती. 5 / 6 शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार इस्रायलच्या किनाऱ्यावर बरीच जुनी बुडालेली जहाजे आहेत. शास्त्रज्ञांनी सांगितले की भूमध्य समुद्रातील या जुन्या जहाजाच्या अवशेषांचा अभ्यास करणे सोपे आहे, कारण येथील समुद्र उथळ आहे आणि त्याचा तळ वालुकामय आहे. 6 / 6 या जहाजातून इतिहासाची बरीच माहिती मिळू शकेल, असा विश्वास शोधकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आणखी वाचा