शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अवघ्या २० मिनिटांत १८ वर्षीय युवकानं पटकावले ४२ लाख रुपये; ‘या’ स्पर्धेत मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 1:37 PM

1 / 8
मासेमारी करणं हा काही जणांचा व्यवसाय असतो तर काही जण शौकसाठी मासे पकडतात. परंतु परदेशात काही देश असे आहेत ज्याठिकाणी मासे पकडण्यासाठी मोठी स्पर्धा आयोजित केली जाते. आणि जिंकणाऱ्यांना पारितोषिक देण्यात येते.
2 / 8
याच स्पर्धेत भाग घेत एका १८ वर्षीय युवकानं अवघ्या २० मिनिटांत ४२ लाख रुपयांचे बक्षिस जिंकले आहे. या स्पर्धेत भाग घेत युवकानं काही मिनिटांत लाखो रुपये कमावले आहेत. त्यामुळे तो लखपती झाला आहे.
3 / 8
डेली स्टारच्या वृत्तानुसार, या ऑस्ट्रेलियन युवकाचं नाव जोनो मूरे(Jono Moore) असं आहे. मूरेने अलीकडेच व्हिक्टोरियाच्या नांबियार शहरात आयोजित केलेल्या गोफिश स्पर्धेत(GoFish competition) भाग घेतला होता.
4 / 8
याठिकाणी बक्षिस जिंकण्यासाठी Murray Cod नावाच्या सर्वात मोठ्या शिकारी माशाला पकडायचं होतं. या स्पर्धेत अनेकांनी भाग घेतला होता. सर्व स्पर्धक मोठ्या जोमानं या स्पर्धेत उतरले होते. परंतु अखेर जोनो मूरेनं बाजी मारली.
5 / 8
मूरने अवघ्या २० मिनिटांत सर्वात मोठी(105 CM) Murray Cod माशाला पकडून ४२ लाख रुपये बक्षिस जिंकले आहे. या स्पर्धेत ८८३ पेक्षा जास्त Murray Cod मासे पकडण्यात आले. परंतु त्यातील माशांची लांबी मूरोनं पकडलेल्या माशाच्या तुलनेत कमी होती.
6 / 8
स्पर्धेत Murray Cod पकडून विविध २२५० मासे पकडण्यात आले. त्यात या स्पर्धेत २ हजार ५९४ बिअर कॅन संपवण्यात आले. ABC न्यूजशी बोलताना जोनो मूरो म्हणाला की, तो लहानपणापासून त्याच्या वडिलांसोबत मासे पकडतो.
7 / 8
मी आणि माझे सहकारी दर विकेंडला फिशिंग करण्यासाठी जातो. आम्ही मासे पकडण्यासाठी मिचेल्टनपासून मर्चिसनपर्यंत सर्वठिकाणी गेलो आहे. आता जिंकलेल्या पैशांतून जोनो मूरो फिशिंग करण्यासाठी बोट खरेदी करणार आहे.
8 / 8
परंतु मिळालेली रक्कम गुंतवणूक करावी अशी त्याच्या आईची इच्छा आहे. यंदाच्या स्पर्धेत मिळालेल्या विजयानंतर जोनो मूरो खूप उत्साहित असून पुढील वर्षी होणाऱ्या गोफिश टूर्नामेंटमध्येही तो भाग घेणार असल्याचं बोलला.