शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कडक सॅल्यूट! ऐकू न शकणाऱ्यांच्या मदतीला धावली विद्यार्थिनी, मास्क बनवते अन् मोफत देते!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 9:29 AM

1 / 9
कोरोना व्हायरसमुळे जगभरात मेडिकल सप्लायचा तुटवडा जाणवत आहे. जगातला सर्वात शक्तीशाली देशातही औषधांचा आणि मास्कचा तुटवडा जाणवत आहे. पण तरी सुद्ध आरोग्य कर्मचारी आपलं काम न डगमगता करत आहेत. ते लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि कोरोनाला मात देण्यासाठी दिवस-रात्र लढत आहेत. अशातच एका कॉलेज विद्यार्थिनीने सर्वांचं मन जिकंलय. तिने अशा लोकांसाठी मास्क तयार केले जे ऐकू शकत नाहीत.
2 / 9
या विद्यार्थिनीचं नाव आहे एशले लॉरेंज. तिने मास्कचा तुटवडा लक्षात घेता, अशा लोकांसाठी मास्क तयार करण्याचा निर्णय घेतला ज्यांना ऐकायला येत नाही किंवा ज्यांना कमी ऐकायला येतं.
3 / 9
एशले ही सध्या स्वत: सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. ती Eastern Kentucky University मध्ये शिक्षण घेत आहे. इथे तिचा विषय डेफ एज्युकेशन हाच आहे.
4 / 9
एशले नवीन प्रोजेक्ट सुरू केला आहे. तिच्या अशा लक्षात आलं की, ज्यांना ऐकायला येत नाही त्यांच्यासाठी स्पेशल असा मास्क उपलब्ध नाही. त्यामुळे तिने यावर काम करण्यास सुरूवात केली.
5 / 9
एशले आणि तिच्या आईने मिळून यावर चर्चा केली. त्यानंतर यावर काम सुरू केलं. एशले स्वत: घरी मास्क तयार करते.
6 / 9
या हॅंडमेड मास्कच्या मधे एक प्लास्टिकची एक खिडकी आहे. ज्यातून मास्क घालणाऱ्या व्यक्तीचे ओठ ऐकू न येणारे लोक वाचू शकतील. म्हणजे त्यांची साइन लॅंग्वेज लोक समजू शकतील.
7 / 9
मीडिया रिपोर्ट्सनुसार अमेरिकेत राहणारी एशले हे मास्क ऐकून न येणाऱ्या लोकांना अगदी मोफत देत आहे. आता तर तिला बाहेरून ऑर्डरही मिळत आहेत. ज्यासाठी ती शिपिंग चार्ज घेऊ शकते.
8 / 9
एशलेचं या कामासाठी सगळीकडून भरभरून कौतुक होत आहे. कारण ती नेहमी दुर्लक्षित राहणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. अनेकांनी तिला यासाठी फंड दिला आहे.
9 / 9
कोरोनासारख्या महामारीत एशलेसारखे असंख्य लोक आहेत जे जगण्याचा खरा अर्थ नकळत सांगूण जातात. पण काही लोक असेही आहेत जे त्यांची सुरक्षा करणाऱ्या लोकांना मारझोड करतात, त्यांच्यावर टीका करतात. पण शेवटी चांगलं काम कुणाच्याही लक्षात राहतं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलAmericaअमेरिका