शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोस्टमोर्टम सुरू होताच मृतकाच्या अंगावर शहारे आले, डॉक्टर चकीत झाले अन् पुढे जे झालं ते पाहून...

By प्रविण मरगळे | Published: March 04, 2021 7:38 PM

1 / 9
ही कोणतीही अफवा नाही, खरी गोष्ट आहे, कर्नाटकात २७ वर्षीय युवकाला खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले, त्यानंतर त्याला पोस्टमोर्टमसाठी अटॉप्सी सेंटरला आणलं, पोस्टमोर्टम सुरु होण्यापूर्वी काही क्षण अगोदर ब्रेन डेड युवकाच्या हातावर काटे उभे राहिले. शरीराची हालचाल झाली हे पाहून डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले, त्यानंतर तातडीनं युवकाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. दोन दिवसापासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
2 / 9
कर्नाटकच्या महालिंगपूर येथे २७ फेब्रुवारीला युवक शंकर गोंबीचा अपघात झाला, त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं, खासगी हॉस्पिटलमध्ये दोन दिवस ठेवल्यानंतर २७ वर्षीय युवक शंकर गोंबीला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले, हॉस्पिटलने कुटुंबीयांना मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले, त्यानंतर सरकारी रुग्णालयात पोस्टमोर्टम करण्याच्या सूचना दिल्या.
3 / 9
खासगी हॉस्पिटलमधून शंकरचा मृतदेह बगलकोट येथील महालिंगापूर येथे सरकारी रुग्णालयात आणला, एकीकडे शंकरचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते, तर हॉस्पिटलने पोस्टमोर्टमची तयारी सुरू केली. ही बातमी हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसारित झाली आहे.
4 / 9
डॉ. एसएस गालगलीने यांनी सांगितले, जेव्हा मी हॉस्पिटलच्या दिशेने कारने जात होतो, तेव्हा संपूर्ण परिसरात मला शंकरचे पोस्टर्स बॅनर्स पाहायला मिळाले, काही लोक अपघाताच्या विरोधात कारवाई करावी यासाठी निषेध आंदोलन करत होते, त्यामुळे पोस्टमोर्टमध्ये कोणाचा मृतदेह पाहावा लागणार याचा अंदाज मला आला.
5 / 9
जेव्हा गालगली हॉस्पिटलला पोहचले तेव्हा शंकर गोंबीला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं, शंकरच्या नातेवाईकांनी डॉक्टर गालगलींना सांगितले की, खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सूचनेनुसार जेव्हा त्याचे व्हेंटिलेटर हटवले जाईल त्यानंतर लगेच त्याचा श्वास थांबेल, त्यामुळे पोस्टमोर्टमआधी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे.
6 / 9
सरकारी रुग्णालयाबाहेर हजारोंच्या संख्येने लोक जमले होते, मी शंकरच्या शरीराचं पोस्टमोर्टम करण्यापूर्वी त्याचा तपास करण्याचा विचार केला, तेव्हा मला त्याच्या अंगावर शहारे उभे राहिल्याचं दिसलं, मला त्याच्या हाताची थोडी हालचालही जाणवली, त्यानंतर मी तातडीने ऑक्सिजन मीटरने त्याच्या ह्दयाचे ठोके चेक केले, त्याची नस तपासली, त्यानंतर मी व्हेंटिलेटर हटवलं.
7 / 9
यानंतर सर्व लोकांना आश्चर्य वाटले, शंकरच्या हाताची हालचाल वाढली, मी लगेच शंकरच्या नातेवाईकांना बोलावलं, तो जिवंत असल्याचं सांगत त्याच्यावर उपचार करावेत म्हटलं, कुटुंबीयांनीही त्याला खासगी रुग्णालयात घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले, त्याच्यावर दोन दिवसांपासून उपचार सुरू आहेत, शरीराचा सर्व भाग उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं डॉक्टर म्हणाले.
8 / 9
डॉ. एएस गालगली म्हणाले की, मी माझ्या १८ वर्षाच्या कारकिर्दीत जवळपास ४०० पेक्षा अधिक पोस्टमोर्टम केले आहे, पण अशी घटना पहिल्यांदाच घडली, दुसरीकडे या अपघाताबाबत पोलिसांना विचारले असता आमच्याकडे कोणतीच तक्रार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
9 / 9
पोलीस अधिकारी म्हणाले की, आरोग्यासंदर्भात बेजबाबदारपणावर कारवाई करण्याचे अधिकार आरोग्य विभागाकडे आहेत. शंकरला ब्रेन डेड घोषित करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याचा निर्णय ते घेऊ शकतात. खासगी रुग्णालय प्रशासनाकडून या गोष्टीवर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
टॅग्स :doctorडॉक्टरPoliceपोलिसAccidentअपघात