31 year old woman left with huge skin tyre after drastic weight loss
क्या बात! वजन कमी करताच पोटावर लटकलं होतं खूपसारं मांस; हातात घेऊन फिरत होती पोट, पण आता.... By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 2:16 PM1 / 9वजन वाढल्याने अनेक आजार होतात हे सांगितलं जातं. त्यामुळेच अनेकांना वाढतं वजन कमी करायचं असतं. मात्र, वजन कमी करणं काही खायचं काम नाही. यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते. अमेरिकेच्या मिनेसोडामध्ये राहणारी ३१ वर्षीय सारा डोवेल्लचं कधीकाळी १५९ किलो वजन होतं. तिला बसायला त्रास होत होत होता. आपलं वजन कमी करण्यासाठी साराने फार मेहनत घेतली आणि ते कमीही केलं. पण त्यानंतरही तिची समस्या संपली नाही. वजन कमी केल्यावर तिची मुख्य समस्या सुरू झाली. साराच्या पोटावर फार जास्त एक्स्ट्रा मांस जमा झालं. तिचं हे लटकणारं मांस तिच्यासाठी नवीन अडचण होतं. हे मांस कमी करण्यासाठी साराला बरेच पैसे खर्च करावे लागले. साराने तिचे ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 2 / 9३१ वर्षीय साराला बालपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. पण टीनएजमध्ये तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं होतं. ज्यामुळे तिचं मानसिक आरोग्य बिघडलं होतं. त्यानंतर तिने तिचा कम्फर्ट खाण्यात शोधला. जंक फूड खाल्ल्याने तिचं वजन खूप वाढलं.3 / 9सारा रोज चीज बर्गर, फ्राइज आणि मिल्सशेक घेत होती. यामुळे तिचं वजन वाढतच गेलं. वाढलेल्या वजनामुळे शाळेत तिच्यावर इतर लोक हसत होते. आपल्या पास्टबाबत साराने लिहिले की, एकदा एका मुलाला तिने डेटसाठी विचारलं होत. तेव्हा त्या मुलाने तिला लठ्ठ म्हणून तिची खिल्ली उडवली होती.4 / 9सारा आता तिची स्टोरी लोकांसोबत शेअर करत आहे. साराने लोकांना सांगितलं की, वजन कमी करणं फार अवघड होतं. पण जेवढी मेहनत तिने केली ती बघून तिला चांगलं वाटतं. साराने सांगितले की, आता स्वत:वर प्रेम करून तिला जाणीव होते की, कधीही स्वत:च्या बॉडीकडे दुर्लक्ष करू नका.5 / 9सर्वातआधी साराने दारू पिणं बंद केलं. यानंतर तिने स्वीमिंगचा आपल्या रूटीनमध्ये समावेश केला. याने साराचं वजन थोडं कमी झालं. साराने २०१८ मध्ये किटो डाएट सुरू केली आणि जिम जॉइन केला. याचा परिणाम असा झाला की, तिचं वजन बरंच कमी झालं.6 / 9पण त्यानंतर साराच्या अडचणी सुरू झाल्या. साराच्या पोटाजवळ स्किनचा एक थर तसाच राहिला. साराने तिच्या वजन कमी करण्याचा प्रवासात याबाबत विचारच केला नव्हता. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला होता. चालताना किंवा बसताना तिला तिच्या पोटाचं मांस नेहमीच एडजस्ट करावं लागत होतं. 7 / 9या स्किनमुळे साराचा आत्मविश्वास फार कमी झाला होता. तिच्याकडे एकच पर्याय होता. सर्जरी करूनच ती ही तिची स्किन दूर करू शकत होती. पण यासाठी खूप खर्च येणार होता. पैशांसाठी साराने क्राउडफंडींग केली. ज्यातून तिला दीड लाख रूपये मिळाले.8 / 9ही स्किन दूर करण्यासाठी साराला ७ तासांच्या सर्जरीचा सामना करावा लागला. सारानुसार सर्जरीनंतर तिचा आत्मविश्वास परत आला आहे.9 / 9सारा आता तिची स्टोरी लोकांसोबत शेअर करत आहे. साराने लोकांना सांगितलं की, वजन कमी करणं फार अवघड होतं. पण जेवढी मेहनत तिने केली ती बघून तिला चांगलं वाटतं. साराने सांगितले की, आता स्वत:वर प्रेम करून तिला जाणीव होते की, कधीही स्वत:च्या बॉडीकडे दुर्लक्ष करू नका. आणखी वाचा Subscribe to Notifications