खतरनाक! पृथ्वी शेजारच्या 'या' ग्रहावर एकत्र तब्बल ३७ ज्वालामुखींचा उद्रेक, 'याला' म्हणतात Corona... By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 1:15 PM
1 / 7 पृथ्वीजवळ एक असा ग्रह आहे ज्यावर तब्बल ३७ ज्वालामुखी सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वीच या ज्वालामुखींचा उद्रेक झाला. यातील काहींमध्ये थोड्या थोड्या अंतराने अजूनही विस्फोट होत आहेत. हा ग्रह जास्त वेळ शांत राहू शकत नाही. यावर सतत काहीना काही होत असतं. 2 / 7 या ग्रहाचं नाव आहे शुक्र. शुक्र ग्रहावर नुकताच एकत्र ३७ ज्वालामुखींचा उद्रेक झाला. यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंडच्या वैज्ञानिकांनी या सक्रिय ज्वालामुखींचा शोध लावला आहे. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, शुक्र ग्रहावर ज्वालामुखींचा उद्रेक झालाय. 3 / 7 शुक्र ग्रहावर झालेल्या ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे ग्रहाच्या सरफेसवर कोरोनासारखे स्ट्रक्चर तयार झाले आहे. कोरोनासारख्या स्ट्रक्चरचा अर्थ होतो की, गोलकार स्ट्रक्चर जे फार खोल आणि मोठे आहेत. या स्ट्रक्चर्सची खोली शुक्र ग्रहांच्या फार आतवर आहे. 4 / 7 या स्ट्रक्चरमधून नुकताच ज्वालामुखीय लाव्हारस बाहेर आला होता. आता यातून गरम गॅस निघत आहे. आतापर्यंत असं मानलं जात होतं की, शुक्र ग्रहाच्या टेक्टोनिक प्लेट्स शांत आहेत. पण असं नाहीये. तिथे या सक्रिय ज्वालामुखीमुळे भूकंप येत आहेत आणि टेक्टोनिक प्लेट्स हलत आहेत. 5 / 7 इन्स्टिट्यूट ऑफ जिओफिजिक्सच्या वैज्ञानिक एना गुल्चर म्हणाल्या की, शुक्र ग्रह भौगोलिक रूपाने शांत नाहीये. कधीच नव्हता आणि पुढेही राहणार नाही. हा रिसर्च नेचर जिओसायन्समध्ये प्रकाशित झाला आहे. 6 / 7 आधी हे मानलं जात होतं की, शुक्र ग्रहाचा अॅक्टिव कोरोनामधून ज्वालामुखीय विस्फोट होत आले आहेत. पण आता असं नाहीये. १९९० पासून ते आतापर्यंत १३३ कोरोनाची माहिती मिळाली आहे. ज्यातील ३७ सक्रिय आहे. या कोरोना खड्ड्यामधून गेल्या २० ते ३० लाख वर्षांपासून विस्फोट होत आहेत. 7 / 7 ज्वालामुखीतील लाव्हारस वाहण्यासाठी कोणत्याही ग्रहावर खड्डे गरजेचे असतात. हे ३७ ज्वालामुखी जास्तकरून शुक्र ग्रहाच्या दक्षिण गोलार्धावर स्थित आहेत. यातील सर्वात मोठ्या कोरोनाला अर्टेमिस म्हणतात. त्याचा व्यास २१०० किमोमीटरचा आहे. आणखी वाचा