काय सांगता! तब्बल २२ कोटी रूपयांना विकल्या गेल्या या मोडक्या-तोडक्या खुर्च्या, पण का रे भौ? By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 1:06 PM
1 / 7 तुम्ही अनेकदा 'शौक बडी चीज होती हैं' असं वाक्य ऐकलं असेल. या शौकापायी लोक काहीही करायला तयार होतात. याची अनेक उदाहरणं बघायला मिळतात. आता हेच बघा ना...या चार जुन्या, मोडलेल्या खुर्च्यांचा लिलाव करण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे या खुर्च्या खरेदी करण्यासाठी लोकही अनेक आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे या खुर्च्या अशा-तशा किंमतीत नाही तर २२ कोटी रूपयांना विकल्या गेल्या. या खुर्च्यांची ही किंमत वाचून लोक हैराण झाले आहेत. चला जाणून घेऊ एवढी किंमत मिळायला या खुर्च्यांमध्ये आहे तरी काय.... 2 / 7 १७७८ मध्ये तयार केलेल्या या चार एंटीक खुर्च्या फ्रान्सचे राजा लुईस XVI चा लहान भाऊ चार्ल्स X साठी बनवल्या होत्या. आता या खुर्च्यांची सीट, मागचा भाग आणि काही पायही तुटले आहेत. 3 / 7 राजाने या खुर्च्या पॅरिसमधील कारागिराकडून खास बनवून घेतल्या होत्या. यासोबतच त्याने एक बेडही तयार केला होता. त्याचाही लिलाव होणार आहे. या खुर्च्या लिलावासाठी समोर येताच इच्छुकांमध्ये स्पर्धा बघायला मिळाली. हा लिलाव आर्टक्यूरिअल द्वारे करण्यात आला. 4 / 7 राजाने या खुर्च्या पॅरिसमधील कारागिराकडून खास बनवून घेतल्या होत्या. यासोबतच त्याने एक बेडही तयार केला होता. त्याचाही लिलाव होणार आहे. या खुर्च्या लिलावासाठी समोर येताच इच्छुकांमध्ये स्पर्धा बघायला मिळाली. हा लिलाव आर्टक्यूरिअल द्वारे करण्यात आला. 5 / 7 या खुर्च्या राजाने त्याच्या भावासाठी आणि एका बहिणीसाठी तयार केल्या होत्या. यांवर एक खास निशाणी होती. आता यांची हालत खराब झालेली असली तर आर्ट पीसच्या बाबतीत अजूनही बेस्ट आहे. 6 / 7 ज्या राजा चार्ल्सच्या या खुर्च्या आहेत. तो राजा फारच बदनाम होता. त्याने १७८९ मध्ये फ्रान्स सोडलं. त्यानंतर तो अनेक देशांमध्ये पळत राहिला. अखेर १८१४ मध्ये पुन्हा देशात परतला. 7 / 7 चार्ल्स X १८२४ ते १८३ पर्यंत फ्रान्सचा राजा होता. यादरम्यान फ्रान्समध्ये मोठी हिंसा झाली. तरी सुद्धा या खुर्च्यांना इतकी किंमत मिळाली हे अचंबित करणारं आहे. आणखी वाचा