4500 year old sun temple found in the desert of Egypt, see the amazing photos
इजिप्तच्या वाळवंटात सापडले 4500 वर्षे जुने सूर्य मंदिर, पाहा चकीत करणारे फोटो... By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 9:56 PM1 / 8 इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेला असलेल्या अबू गोराबच्या वाळवंटात काही पुरातत्वशास्त्रज्ञ खाणकाम करत होते. यादरम्यान त्यांना एक प्राचीन मंदिर सापडलं आहे. सूर्यदेवाचे हे मंदिर पाहून सर्व जण आश्चर्यचकीत झाले. गेल्या 4500 वर्षांपासून हे मंदिर वाळवंटात दफन झाले होते. गेल्या दशकातील हा सर्वात मोठा शोध असल्याचे इजिप्शियन पुरातत्वशास्त्रज्ञांचे मत आहे. हे मंदिर तत्कालीन इजिप्शियन फॅरोने बांधल्याचा अंदाज आहे.2 / 8 इजिप्तमध्ये आतापर्यंत दोन प्राचीन सूर्य मंदिरे सापडली आहेत. वॉर्सा स्थित अकादमी ऑफ सायन्सेसमधील इजिप्तोलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मासिमिलनो नुझोलो सांगतात की, आम्ही अशा प्राचीन वस्तूंच्या शोधासाठी बराच वेळ दिला जातो. प्राचीन संस्कृती आणि त्या काळातील बांधकाम कलेचे दर्शन घडवणारी वास्तू पाहून सर्वाजण आश्चर्यचकीत झाले आहेत. येणाऱ्या काळात यातून खूप काही शिकायला मिळेल.3 / 8 पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते, हे मंदिर पाचव्या राज्याच्या फॅरोने तो जिवंत असताना बांधून घेतले होते. लोकांनी त्याला देवाचा दर्जा द्यावा हा त्याचा उद्देश होता. दुसरीकडे, त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी पिरॅमिड बांधले आणि त्यात त्याला दफन केले.4 / 8 इजिप्तच्या उत्तरेला पुरातत्वशास्त्रज्ञांना सापडलेल्या सूर्यमंदिरावरुन असे कळले की, देशात आणखी सूर्यमंदिरे आहेत. त्यानंतर देशभरात या मंदिरांचा शोध सुरू झाला. तेव्हा कळले की इजिप्तमध्ये अशी सहा सूर्य मंदिरे आहेत, जी 4500 वर्षांपूर्वी बांधली गेली होती. त्यापैकी एक नुकताच अबू गोराबच्या वाळवंटात सापडले आहे.5 / 8 इजिप्तच्या पाचव्या राज्याच्या फॅरो न्युसेरे इनी याने ही मंदिरे बांधली. आता सापडलेले मंदिरही त्यांनीच बांधले होते. नुसिरी इनीने ईसापूर्व 25व्या शतकात 30 वर्षे राज्य केले. पुरातत्व शास्त्रज्ञांनी अधिक तपास केला असता, हे मंदिर मातीच्या विटांनी बांधलेले असल्याचे आढळून आले. या मंदिराला दोन फूट खोल चुनखडीचा पाया होता.6 / 8 मूळ मंदिर खूपच प्रेक्षणीय असावे, असे जाणकारांचे मत आहे. कारण अबू गोराबमध्ये सापडलेल्या अवशेषांच्या सहाय्याने त्यांनी संगणकावर या मंदिराची रचना केली. हे मंदिर बघायला खूप सुंदर दिसते. याशिवाय पुरातत्वशास्त्रज्ञांना प्राचीन जागेवरुन मातीचा जारही सापडला, ज्यात माती भरलेली होती. या भांड्यांमध्ये कोणत्याही पूजेच्या वेळी सूर्यदेवाला नैवेद्य दाखवला जात असावा.7 / 8 अबू गोराबच्या वाळवंटात जमिनीखाली काहीतरी लपलेले आहे, अशी कल्पना आम्हाला फार पूर्वीपासूनच आली होती. पण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्वेषण करू हे माहीत नव्हते. आमच्याकडे आता इजिप्शियन सूर्य मंदिरांच्या कथा सांगण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. मात्र, सूर्यमंदिराच्या उभारणीमागचा खरा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे डॉ. जे नुसिरीने सांगितले.8 / 8 डॉ. मास्सिमिलानो नुझोलो म्हणाले की, हे मंदिर कोणा फारोने बांधले होते की त्याच्या काळातील वेगळ्या फारोनेही हे काम केले होते हे अद्याप निश्चित झालेले नाही. इजिप्तचे पाचवे राज्य सुमारे 150 वर्षे टिकले. हे 25 व्या शतकापासून ते 24 व्या शतकाच्या मध्यापर्यंत होते. दुसरी गोष्ट म्हणजे लहान राजांनी सूर्यमंदिर बांधल्याचा इतिहासही नोंदलेला आहे. इजिप्शियन लोक सूर्य देवाला रा नावाने संबोधले. जे नाईल नदीच्या काठावर बांधले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications