शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंडरवर्ल्ड विश्वातील टॉप पाच लेडी डॉन, त्यांचे कारनामे वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 3:44 PM

1 / 6
जेव्हाही जगातल्या गुन्हेगारी विश्वातील डॉनचा विषय निघतो, तेव्हा प्रत्येकाच्याच डोळ्यांसमोर एखादा पुरुषच येतो. पण गुन्हेगारी विश्वात केवळ पुरुषच डॉन नाहीतर अनेक लेडी डॉनही आहेत. या महिला लेडी डॉनबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला जगातल्या टॉप पाच महिला गॅंगस्टरबद्दल सांगणार आहोत ज्यांचे कारनामे वाचून तुम्ही थक्क व्हाल.
2 / 6
क्लाऊडीया ओचाओ फेलिक्स - क्लाऊडीया ओचाओ फेलिक्स मेक्सिकोमधील पहिली महिला ड्रग लॉर्ड आहे, जिने स्वत:ची क्राइम फॅमिली तयार केली. दिसायला सुंदर असलेल्या क्लाऊडीयाला मेक्सिकोमध्ये क्राईम विश्वातील किम कारदीशिया म्हणूनही ओळखले जाते. १९८७ मध्ये जन्मलेल्या क्लाऊडीयाला खूप खतरनाक मानलं जातं. क्लाऊडीयावर शेकडो लोकांच्या खूनाचे गुन्हे आहेत. यूएस इंटॅलिजन्सच्या रिपोर्टनुसार तिची लॉस अॅंन्त्रॅक्स ही गॅंग जगातली सर्वात मोठी ह्युमन ट्रॅफिकींग गॅंग आहे. क्लाऊडीयाचा पती या गॅंगचा मुख्य होता. त्याला अटक झाल्यानंतर ती या गॅंगची प्रमुख झाली. 2019 मध्ये ड्रग्समुळे तिचं निधन झालं.
3 / 6
सॅंड्रा अव्हिला बेल्ट्रन - मेक्सिकोमधील सर्वात मोठी ड्रग्स डिलर म्हणून गॅंगस्टर सॅंड्रा ओळखली जाते. सॅंड्राचं ड्रग्स साम्राज्य इतकं मोठं आहे की, एकेकाळी तिला मेक्सिकोमधील सर्वात श्रीमंत महिला मानलं जायचं. सॅंड्राने दोनदा लग्ने केलीत आणि दोन्हीही पती निवृत्त पोलीस होते. तेही नंतर ड्रग डिलर बनले. या दोघांचीही नंतर हत्या झाली. सॅंड्रावरच या दोघांच्या हत्येचा संशय आहे.
4 / 6
मेलिसा काल्डेरॉन -मेलिसाला सध्या जगातल्या सर्वात घातक महिला गॅंगस्टर्सपैकी एक मानलं जातं. मेलिसाने आतापर्य़ंत १५० लोकांची हत्या केल्याचा रिपोर्ट आहे. मेलिसा अंडरवर्ल्डमध्ये ला चीना या नावानेही ओळखली जाते. पोलिसांच्या माहितीनुसार, मेलिसाच्या गॅंगमध्ये ३०० पेक्षा जास्त लोक आहेत. ३२ वर्षीय मेलिसा ही सध्या ड्रग ट्रॅफिकींग आणि सुपारी घेऊन किलिंगचे काम करत होती. २०१५ मध्ये तिला अटक करण्यात आली आहे.
5 / 6
समेंथा ल्यूथवेट - व्हाईट विडो नावाने कुप्रसिद्ध ब्रिटेनच्या समेंथा ल्यूथवेटवर ४०० पेक्षा जास्त लोकांची हत्या करण्याचा आरोप आहे. ती एक महिला आतंकवादी आहे. इतकेच नाहीतर ती सोमालिया, केनियामधील आतंकवादी हल्यातही सामिल होती. ३२ वर्षीय समेंथाने सोमालियातील अल शबाब या आतंकवादी संघटनेत सामिल झाल्यावर ४०० पेक्षा जास्त लोकांची हत्या केली आहे. तिच्यावर केनिया विश्वविद्यालयावर हल्ला करण्याचाही आरोप आहे. ज्यात १४८ लोक मारले गेले होते. समेंथा ही चार मुलांची आई आहे. अल शबाबच्या अहमद उमरसोबत तिने हात मिळवला आहे. रिपोर्टनुसार समेंथा सध्या इस्लामिक स्टेटला मदत करत आहे.
6 / 6
एनेडीना अर्लानो फेलिक्स - एनेडीनाला ‘द बॉस’, ‘द गॉडमदर’, आणि ‘द नार्कोमदर’ सारख्या नावांनी ओळखले जाते. एनेडीयाना ही मेक्सिओमधील सर्वात मोठ्या ड्रग डीलर गॅंगची बॉस आहे. एनेडीना आधी ही गॅंग चालवणा-या पाच भावांची सल्लागार होती. नंतर तिनेच या गॅंगला आपल्या ताब्यात घेतलं.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स