5 People started farming with the new technology success chandauli
भारीच! नव्या तंत्राने शेती करायला घेतली, इतरांनी हलक्यात घेतलं; अन् ३ वर्षात पठ्ठ्याचं नशिबच पालटलं By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 7:15 PM1 / 10शेतकर्यांचे आंदोलन थांबवण्याचे नाव घेत नाही. शेतकरी त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. एकीकडे देशाच्या विविध भागातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेशात असे बरेच शेतकरी आहेत ज्यांनी अधुनिक शेती करून यश मिळवलं आहे. 2 / 10पूर्व उत्तर प्रदेशातील चंदौली येथे असे काही शेतकरी आहेत जे पारंपारिक शेती सोडून नवीन तंत्रज्ञान वापरत आहेत आणि या नवीन तंत्रज्ञानामुळे ते केवळ शेतीचे चित्र बदलत नाहीत तर त्यांचे नशिबही सुधारत आहेत.3 / 10चंदौलीच्या चहनिया ब्लॉकचे शेतकरी जयंतसिंग आणि राहुल मिश्रा यांच्यासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षात वैज्ञानिक पध्दतीचा वापर करून शेतीचे चित्र बदलले आहे.4 / 10चंदौली येथील शेतकरी टोमॅटो, कोबी, शिमला मिरची, हिरवी मिरची, कोबी, तसेच केळी, पपई, स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रुट्सची लागवड सुमारे 100 बिघा जमिनीमध्ये करत आहे. या आधुनिक शेतीमुळे या शेतकर्यांचे आयुष्य बदलले आहे आणि त्यांचे उत्पन्न अनेक पटींनी वाढले आहे.5 / 10खरं तर, जेव्हा चांदौली जिल्ह्यातील चहनिया ब्लॉकमधील देवरा खेड्यातील रहिवासी मिश्रा आणि जोडा हरधन गावचे जयंतसिंग आणि त्यांचे तीन मित्र रवीसिंग, सोनू सिंह आणि अनूप यांनी आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा गावातील काही लोकांनी त्यांचा विरोध केला. अनेकांनी चेष्टा केली.6 / 10तरिही हे शेतकरी निराश झाले नाहीत. त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली. पहिल्या वर्षी या लोकांनी पपई आणि केळीची लागवड केली. जेव्हा त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळाला, तेव्हा त्यांनाही प्रोत्साहन मिळालं आणि त्यांनी ही पिके मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा निर्णय घेतला. आज हे लोक जवळपास 100 बीघामध्ये या प्रकारची शेती करीत आहेत.7 / 10पीक तयार झाल्यानंतर फळे आणि भाज्या वाराणसीच्या बाजारात नेऊन विकल्या जातात. शेतकरी जयंत सिंह म्हणतात की, ''राज्यात अधुनिक शेती केल्यावर या लोकांच्या जीवनशैलीत बरीच बदल झाला आहे आणि त्यातून नफादेखील मिळाला आहे.''8 / 10त्याचवेळी अनूप मिश्रा यांनी सांगितले की, '' यापुर्वीही शेतात गहू व बाजरीचे पीक असायचे परंतु काही वर्षांपूर्वी जेव्हा मी कृषी प्रदर्शनात रोपे लावली तेव्हा मला वाटलेकी ते आपल्या शेतात का वापरु नये. यानंतर 5 जणांचा गट तयार करून आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली ज्यामध्ये मला चांगला नफा मिळाला.''9 / 10तरुण शेतकरी रविसिंग यांनी सांगितले की,'' मी वर्षांपूर्वी या प्रकारची शेती सुरू केली आणि माझे उत्पन्नही खूप वाढले आहे, त्यामुळे जीवनशैलीही बरीच बदलली आहे.'' चांदौली जिल्ह्यातील हे तीन शेतकरी कृषी विधेयकास संमती देतात आणि ते म्हणतात की,'' हे कृषी बिल हे शेतकर्यांच्या हिताचे आहे. म्हणून, याला विरोध करणे योग्य नाही.'' (image Credit- aajtak)10 / 10तरुण शेतकरी रविसिंग यांनी सांगितले की,'' मी वर्षांपूर्वी या प्रकारची शेती सुरू केली आणि माझे उत्पन्नही खूप वाढले आहे, त्यामुळे जीवनशैलीही बरीच बदलली आहे.'' चांदौली जिल्ह्यातील हे तीन शेतकरी कृषी विधेयकास संमती देतात आणि ते म्हणतात की,'' हे कृषी बिल हे शेतकर्यांच्या हिताचे आहे. म्हणून, याला विरोध करणे योग्य नाही.'' (image Credit- aajtak) आणखी वाचा Subscribe to Notifications